Indian Agriculture : तेणे मुक्ती चारी साधियेल्या...

रघु मामाच्या पोरानं पुण्यात (हे गावात सांगितलं,पण फ्लॅट रांजणगाव जवळ कुठंतरी असतो) फ्लॅट घेतला. पोरगं बापाला म्हणलं, "दादा, किती दिवस शेतीचं बघणार? आता भाऊ बघतोय सगळं, तुम्ही चला पुण्याला..."
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon
Published on
Updated on

अशोक पवार


रघु मामाच्या पोरानं पुण्यात (हे गावात सांगितलं,पण फ्लॅट रांजणगाव जवळ कुठंतरी असतो) फ्लॅट घेतला. पोरगं बापाला म्हणलं,  "दादा, किती दिवस शेतीचं बघणार? आता भाऊ बघतोय सगळं, तुम्ही चला पुण्याला..." 
मामा म्हटले की, अरे मी कुठं काय काम करतो,सकाळी भाकरी घेऊन जातो आंब्याखाली बसतो आणि हरिपाठ चालू व्हायच्या आत गावात येतो. 

Indian Agriculture
Indian Agriculture : पोटासाठी शेतकरी बनला हमाल; शेतीचे प्रयोगही सुरू

``ते काही नाही. तुम्ही आता पुण्यातच रहायचं. हो ना करत मामा तयार झाला.`` 
ज्वारीचा एक आणि गव्हाचा एक कट्टा, काळं तिखट, पिवळं तिखट, आंब्याचा, मिरच्यांचा खार (लोणचे), शेंगदाण्याची आणि जवसाची चटणी इ. साहित्य सुनेला बांधायला सांगितले. दुसऱ्या दिवशी सूर्यफूल, शेंगा मिसळून घण्यातून तेल गाळून आणलं. थोडं घरी ठेऊन पाच लिटरचा डबा भरून पुण्याला जायला मामा तयार झाला.

Indian Agriculture
Indian Agriculture : गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पदासाठी फुटले भाव

गावातला अफरोज चेन्नईहुन माल भरून मुंबईला निघाला होता, त्याच्या ट्रकमध्ये सगळा माल भरला आणि मामा एकदाचा पुण्याला गेले. पंधरा दिवस कसेबसे गेले. देहू, आळंदी आणि साई मंदिराला भेट देऊन झाली. बिजेला गावाकडील मंडळी देहूला गेली आणि मामाच्या मनानं उचल खाल्ली.पोराला फोन लावला आणि गावाकडून आलेल्या पिकपमध्ये मामा गावाकडे परत आले.
हरिपाठात मामाचा आवाज ऐकू आला म्हणून देवळाकडे गेलो.

मामा "तेणे मुक्ती चारी साधियेल्या" वर बराच वेळ रेंगाळत होते. हरिपाठ संपला आणि मामा आमच्याजवळ येऊन टेकले. मी म्हटलं "केव्हा आले पुणेकर"? तर मामा म्हणाले, चालू केली का टिंगल? 
म्हटलं लवकर फिरलात माघारी? ``आरं काय सांगू? ह्यांचं घर तेराव्या मजल्यावर. ही दोघे सकाळी आठला जाणार आणि त्या घरात मी एकटाच. टीव्ही बघावं तर किती आणि कुठं जावं म्हटलं तर मुलुख माहित नाही. बीजेला ही लोकं आली तर तिथं रहावंना. आलो निघून.`` 
मी म्हटलं की, बरं झालं आलात. आम्हालाही करमत न्हवतं. तर मामा म्हणाले  " मला माहित हाय तुला मुडदा आणायच्या गाडीत बसू वाटत नाही म्हणून तर चार लोकात बसून आलो..." आणि कमरेचा बटवा काढून पान दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com