July Rainfall : जुलै महिन्यात पावसाने ओलांडली सरासरी

Monsoon Rain : परभणी व हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी जुलै महिन्यातील पावसाने सरासरी ओलांडली आहे.
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी जुलै महिन्यातील पावसाने सरासरी ओलांडली आहे.जुलै महिन्यात परभणी जिल्ह्यात सरासरी २१९.२ मिलिमीटर अपेक्षित असतांना यंदा (२०२५) प्रत्यक्षात २२५.६ मिलिमीटर (१०२.९ टक्के) तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी २३०.२ मिलिमीटर अपेक्षित असतांना यंदा प्रत्यक्षात २३७.७ मिलिमीटर (१०३.३ टक्के) पाऊस झाला. परंतु जून महिन्यातील तूट भरून निघाली नाही. या दोन जिल्ह्यातील ४३ मंडलात जुलै महिन्यातील सरासरीहून कमी तर ६३ मंडलात जून व जुलै महिन्यांच्या सरासरीहून कमी पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यात जुलैत २३ मंडलांत कमी पाऊस...

जिल्ह्यात यंदा जून मध्ये सरासरीपेक्षा ६४.१ मिलिमीटर कमी पाऊस झाला. मात्र जुलै महिन्यात सलग दुसऱ्या वर्षी पावसाने सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. परभणी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या ६ तालुक्यांमधील २३ मंडलामध्ये सरासरीहून कमी पाऊस झाला. त्यात सिंगणापूर ९३.६ टक्के, दैठणा ४९.८ पिंगळी ८३, परभणी ग्रामीण ८६.७, टाकळी कुंभकर्ण ९९, केकरजवळा ९५.९ टक्के, आवलगाव ८४.३, शेळगाव ८४.३, वडगाव ७४.२, गंगाखेड ५४.७, महातपुरी ४९.८, माखणी ५८.६, राणीसावरगाव ४२.५, पिंपळदरी ५२.९, पालम ९३.४, चाटोरी ४९.५, बनवस ३०.४, रावराजूर ८०.५, पू्र्णा ७८.९, ताडकळस ९१.४, लिमला ८३.१, कात्नेश्वर ७७.२, चुडावा ७४.५, कावलगाव ६०.४ टक्के पाऊस झाला.

Rain
Monsoon Rain Issue: पावसाचा अडीचा डाव; पेरण्याही हिरमुसल्या

जिल्ह्यात जून व जुलै मध्ये सरासरी ३६४.५ मिलिमीटर अपेक्षित असतांना यंदा प्रत्यक्षात ३०६.७ मिलिमीटर (८४.१ टक्के) पाऊस झाला. या दोन महिन्यात जिंतूर मंडलात १२४.८ टक्के, सावंगी म्हाळसा १०९.२, बामणी १००.४, बोरी १००.२, वाघी धानोरा १४२.५ टक्के, देऊळगावगात १००, चिकलठाणा १०२.४ टक्के, पाथरी १२८.१ टक्के, हादगाव १२७.१, कासापुरी १६८.६ टक्के या १० मंडलात सरासरीपेक्षा जास्त तर उर्वरित ४२ मंडलात सरासरीहून कमी पाऊस झाला.

Rain
Rain Crop Damage : मुसळधारेने काही तासांत होत्याचे नव्हते

हिंगोली जिल्ह्यात जुलैत २० मंडलांत कमी पाऊस....

हिंगोलीत यंदाच्या जून मध्ये ३७.२ मिलिमीटर पावसाची तूट झाली. जुलै महिन्यात भरुन निघाली आहे. सलग सहाव्या वर्षी जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. जुलैमध्ये वाकोडी मंडलात १११.६ टक्के, डोंगरकडा १०१.६ टक्के, वारंगा ११४.८ टक्के, औंढानागनाथ मंडलात १२३.५ टक्के, येळेगाव १२२.९, साळणा १४२.८, जवळा बाजार १३८.३, साखरा १०६.९, पानकन्हेरगाव १५१.२, हत्ता १२४.३ टक्के या १० मंडलात सरासरीपेक्षा जास्त झाला तर उर्वरित २० मंडलात सरासरीहून कमी पाऊस झाला.

जून व जुलै मध्ये ३९९.४ मिलिमीटर अपेक्षित असतांना यंदा प्रत्यक्षात ३६९.८ मिलिमीटर पाऊस झाला. वाकोडी मंडलात १०३.७ टक्के, वारंगा १०४.६ टक्के, हट्टा १०६.९ टक्के, औंढानागनाथ मंडलात १०१.९ टक्के, येळेगाव १०७.७ टक्के, साळणा ११६.७ टक्के, जवळा बाजार ११०.५ टक्के, पानकन्हेरगाव १२७.५ टक्के, या ९ मंडलात सरासरीहून जास्त तर उर्वरित २१ मंडळात सरासरीहून कमी पाऊस झाला.

Rain Update
Rain UpdateAgrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com