
Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यात यंदा जून आणि जुलैमध्ये पावसाच्या लहरीपणाने खरिपाच्या पेरण्यांसह फळबागांना अडचणीत आणले आहे. आठ जिल्ह्यांपैकी केवळ जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतच पावसाने सरासरी गाठल्याने उर्वरित सहा जिल्ह्यांत चिंता वाढली आहे. काहींच्या पेरण्या लांबणीवर पडल्या, तर काहींना दुबार पेरणी करावी लागली. परिणामी छ.संभाजीनगर व लातूर या कृषी विभागांत एकूण पेरणीने अपेक्षित आकडा गाठलेला नाही.
केवळ दोन जिल्ह्यांनी गाठली सरासरी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ जून ते ३१ जुलैपर्यंत सरासरी पर्जन्यमान २७७.४ मिलिमीटर इतके आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात २९०.४ मिलिमीटर म्हणजे सरासरी पावसाच्या तुलनेत १०४.७ टक्के पाऊस झाला. जालना जिल्ह्याची आजवरची पावसाची सरासरी २९९ मिलिमीटर असताना प्रत्यक्षात ३४३.६ मिलिमीटर म्हणजे सरासरी पावसाच्या तुलनेत ११४.६ टक्के पाऊस झाला.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी पाऊस २५६.१ मिलिमीटर अपेक्षित असताना प्रत्यक्षात १९९.१ मिलिमीटर म्हणजे सुमारे ७७.७ टक्के पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात आतापर्यंतचे सरासरी पर्जन्यमान ३२२.३ मिलिमीटर अपेक्षित असताना प्रत्यक्षात २१३.२ मिलिमीटर म्हणजे सुमारे ६६.१ टक्केच पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यातील आतपर्यंत सरासरी पर्जन्यमान २६४ मिलिमीटर अपेक्षित असताना प्रत्यक्षात २४१.८ मिलिमीटर म्हणजे ९१.६ टक्केच पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ३९९.७ मिलिमीटर अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३४८ मिलिमीटर म्हणजे सुमारे ८७.१ टक्केच पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ३६४.५ मिलिमीटर अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३०६.७ मिलिमीटर म्हणजे सरासरी पावसाच्या सुमारे ८४.१ टक्के पाऊस झाला. तर हिंगोली जिल्ह्यात ३९९.४ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३६९.८ मिलिमीटर म्हणजे सरासरी पावसाच्या तुलनेत ९२.६ टक्केच पाऊस झाला.
लातूर विभागात कमीच पाऊस
विभागनिहाय विचार करता छत्रपती संभाजीनगर विभागातील तीन जिल्ह्यांत सरासरी २७७.५ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात २७७.७ मिलिमीटर म्हणजे सरासरी पावसाच्या तुलनेत ९९.१ टक्के पाऊस झाला. दुसरीकडे लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत आत्तापर्यंत सरासरी ३५० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात २९५.९ मिलिमीटर म्हणजे सरासरी पावसाच्या तुलनेत ८४.३ टक्केच पाऊस झाला आहे.
मुद्दा अडीच मिलिमीटरचा
साधारणपणे अडीच मिलिमीटर पाऊस झाला की तो पावसाचा दिवस गणला जातो. मुळात अडीच मिलिमीटर झालेला पाऊस खरंच पिकांना पोषक असतो का? मग असा पाऊस पडला तर पावसाचा दिवस गणने योग्य का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो आहे.
काही ठिकाणी अति पावसामुळे प्रश्न निर्माण
मोसंबीची फळगळ वाढली
कपाशी पिकात आकस्मिक मर
डाळिंबात पान आणि फळावर डाग
सीताफळातही फळगळीला सुरुवात
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.