Shirsai Irrigation Scheme : शिरसाई उपसा सिंचन योजनेचे आवर्तन तत्काळ सोडण्याची मागणी

Agriculture Irrigation : तालुक्याच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेल्या शिरसाई उपसा सिंचन योजनेतील पाणी वापर संस्थेच्या पदाधिकारी व लाभार्थी शेतकऱ्यांची बैठक नुकतीच उंडवडी सुपे येथे पार पडली.
Shirsai Irrigation Scheme
Shirsai Irrigation Scheme Agrowon
Published on
Updated on

Baramati News : तालुक्याच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेल्या शिरसाई उपसा सिंचन योजनेतील पाणी वापर संस्थेच्या पदाधिकारी व लाभार्थी शेतकऱ्यांची बैठक नुकतीच उंडवडी सुपे येथे पार पडली. यामध्ये पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शिरसाई उपसा सिंचन योजनेचे आवर्तन तत्काळ सोडण्याची मागणी एकमुखाने शेतकऱ्यांनी केली आहे.

यंदा शिरसाईच्या लाभार्थी भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दिवाळीपूर्वीच बारामतीच्या जिरायती गावात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शिरसाईचे आवर्तन तत्काळ सोडण्याची मागणी येथील बैठकीत शेतकऱ्यांनी एकमताने केली.

Shirsai Irrigation Scheme
Agriculture Irrigation : रब्बीसाठी म्हैसाळचे आवर्तन सुरू

यापूर्वी खरीप हंगामात पाण्यासाठी शिरसाईच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी दोन दिवस उंडवडी सुप्यात चक्री उपोषण केले होते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामासाठी आवर्तन वेळेत सोडावे, अशी मागणी या वेळी शेतकऱ्यांनी केली.

Shirsai Irrigation Scheme
Agriculture Irrigation : ‘सिद्धेश्वर’च्या पाणी आवर्तनास उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

या बैठकीत योजनेचे नियोजित रब्बी हंगामातील आवर्तन, पाण्याची गळती, थकीत पाणीपट्टी, मुख्य कालव्यात पाइपलाइप तसेच योजनेचे पाणी ‘टेल टू हेड’ वाटप व बेकायदेशीर कालव्यातील पाइप काढणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी जराडवाडीचे माजी सरपंच छगन जराड, सुहास काळे, नानासो भापकर, कल्याण भापकर, पोपट गवळी, देवीदास गवळी आदींसह शेतकरी उपस्थित होते.

या वेळी उंडवडी सुपे, जराडवाडी, सोनवडी सुपे, खराडेवाडी, कारखेल, अंजनगाव, जळगाव सुपे आदी गावांतील शेतकरी उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांनी यापूर्वी आलेल्या विविध अडचणी मांडल्या. भविष्यातील अडचणी सोडविण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी निवेदन देवून पाठपुरावा करण्याचे सर्वानुमते ठरले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com