Konkan Coast : खवळलेल्या समुद्राचा जलपर्यंटनाला ब्रेक; आजपासून ३१ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

Tourist Places Closed in Konkan : कोकणातील किनारपट्टी भागातील गजबजलेली पर्यटन स्थळं आजपासून बंद होणार आहेत. रविवार २६ मे पासून ३१ ऑगस्टपर्यंत जलपर्यंटन बंद राहणार आहे.
Konkan Coast
Konkan CoastAgrowon

Pune News : सध्या देशातील विविध भागात वेगवेगळ वातावरण पाहायला मिळत असून प.बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळ तयार झाले आहे. ते ‘रेमल’ चक्रीवादळ असून रविवारी ६ च्या सुमारास पश्चिम बंगालच्या किनार पट्टीवर धडकणार आहे. याचा परिणाम अरबी समुद्रातही दिसणार असून येथे वाऱ्याचा वेग आणि समुद्री लाटा खवळण्याची शक्यता आहे. तसेच यंदा मान्सूनही चांगला बरणार असल्याने समुद्रात जाण्यास हवामान विभागाने मनाई केली आहे. यावरूनच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून रविवार २६ मे पासून ३१ ऑगस्टपर्यंत कोकणातील जलपर्यंटनावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मुरुडमधील जंजिरा किल्ला देखील पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे व्यावसायिंकासह पर्यटकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.

सध्या मे महिना सुरू असून शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. पण राज्यात लोकसभा निवडणुकांच्या धामधूमीमुळे अनेक जणांनी फॅमिली ट्रीप या थांबवल्या होत्या. पण आता मतदान पार पडल्याने अनेकांनी कोकणात जाणे पसंत केले आहे. येथे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये असणाऱ्या स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, पॅरासेलिंग या साहसी खेळासह जंजिरा किल्ला बोट राईडमुळे पर्यटक आनंद लुटण्यासाठी कोकणाकडे वळत आहेत.

Konkan Coast
Konkan Agricultural University : विद्यापीठाचे संशोधन तळागाळात पोहोचवू

मात्र अनेकांच्या फॅमिली ट्रीपवर आता पाणी फिरले असून आज रविवार (ता.२६) पासूनच कोकणातील जलपर्यंटन बंद करण्यात येणार असून ती ३१ ऑगस्टपर्यंत बंद असतील. याबाबत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने आदेश दिले असून खवळलेल्या समुद्रामुळे जलपर्यटन बंद ठवले जाणार असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. तर हा निर्णय पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतल्याचेही बोर्डाने म्हटले आहे. तसेच व्यावसायिकांनी वॉटर स्पोर्ट्स किंवा बोटिंग सुरु ठेवल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देखील मेरीटाईम बोर्डाने दिला आहे.

Konkan Coast
Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

दरम्यान मुरूड तालुयातील जंजिरा जलदुर्ग किल्ला देखील सुरक्षेच्या कारणास्तव २६ मेपासून ३१ ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत अलिबाग-मुरूड पुरातत्त्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी माहिती दिली आहे.

२६ मेपासून ३१ ऑगस्ट या कालावधीत समुद्राच्या मोठ्या लाटा उसळतात. यामुळे पर्यटकांची सुरक्षितता महत्त्वाची असते. कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी शासकीय स्तरावरून हा निर्णय घेतला जातो. यामुळे दरवर्षीप्रमाणे जंजिरा जलदुर्ग २५ मे पासून पर्यटकांना आतून पाहण्यासाठी बंद केला जातो.

तसेच २६ मेपासून जंजिर्‍याचे दरवाजे बंद करावेत, असे आदेश मेरिटाईम बोर्ड आणि पुरातत्त्व खात्याला प्राप्त झाले आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची येलीकर यांनी दिली आहे. पण जंजिरा जलदुर्ग खोरा अथवा राजपुरी जेट्टीवरून बाहेरून पाहता येतो. मात्र समुद्रात जाण्यास बंदी असेल, अशी माहिती येलीकर यांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com