Water Crisis: काश्‍मीरमध्ये पाणीटंचाईचे चटके

Water Shortage: जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचे प्रमाण ८१ टक्क्यांनी घटल्याने राज्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी जलसंवर्धनावर भर देण्याचे आवाहन केले असून, राज्य सरकार पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी विविध उपाययोजना राबवणार आहे.
Water Issue
Water IssueAgrowon
Published on
Updated on

Shrinagar News: देशाचे नंदनवन असलेल्या जम्मू-काश्‍मीरला यंदा पाणीटंचाईशी सामना करावा लागणार आहे. जम्मू कश्‍मीरमध्ये तुलनेने कमी पाऊस पडल्याने शुष्क भागात आग लागण्याच्या घटनाही घडत आहेत. श्रीनगर, जम्मूसह ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके बसत असताना जम्मू-काश्‍मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राज्यात पाणीटंचाईचे संकट असल्याचे सांगत त्यावर मात करण्यासाठी जलसंपदा विभागाच्य विविध उपायांचा आढावा घेतला जात असल्याचे नमूद केले.

मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडिया एक्सवर म्हटले, की जम्मू-काश्‍मीरमध्ये या वर्षी पाणीटंचाईची स्थिती आहे. अर्थात अशी स्थिती निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. वास्तविक गेल्या अनेक वर्षांपासून काश्‍मीरमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे यंदा मात्र सरकारला जल व्यवस्थापन आणि सुरक्षित करण्यासाठी अधिक सक्षमपणे काम करावे लागणार आहे.

Water Issue
Water Scarcity: जल स्वयंपूर्ण गावांचा आराखडा: पाणी टंचाई दूर करण्यासाठी ग्रामीण भागात नवीन दिशा

मात्र पाणी वाचविण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही. राज्यातील जनतेने देखील पाण्याचा काटकसरीने वापर करून सरकारला सहकार्य करायला हवे. जनतेने पाणी वाया घालविण्याच्या वृत्तीपासून दूर राहिले पाहिजे. राज्यातील जलसंपदा विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या उपायांचा आढावा घेतला जाईल आणि काही महिन्यांत जनतेशी थेटपणे बोलून सामूहिक रूपाने पाणीटंचाईवर मार्ग कसा काढता येईल, यावर विचार करू, असे उमर अब्दुल्ला म्हणाले.

Water Issue
Water Conservation : लाडेगाव होणार ‘जलतारा’चे रोल मॉडेल

काश्‍मीर खोऱ्यात कमी पाऊस

शेरे काश्‍मीर विद्यापीठाच्या कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शास्त्रज्ञ डॉ. समीरा कयूम यांनी केंद्रशासित प्रदेशातील बदलत्या वातावरणावरून चिंता व्यक्त केली आहे. संपूर्ण काश्‍मीर खोऱ्यात हवामानात असामान्य बदल झाल्याने तापमान सतत कमी-जास्त राहत आहे. या वर्षी काश्‍मीर खोऱ्यात ८१ टक्के पाऊस कमी पडल्याने जमिनीत ओलावा कमी आहे.

परिस्थिती अशीच राहिल्यास, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हिमवृष्टी, पाऊस कमी झाल्यास पाणी समस्या गंभीर रूप धारण करेल. डॉ. कयूम म्हणाले, की दुष्काळाच्या सध्याच्या स्थितीत पुढील काळात सुधारणा झाली तरी रब्बी आणि खरीप पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध राहणार नाही. तापमान वाढीने खोऱ्यातील फुले वेळपूर्वीच उमलत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com