Organic Farming : सेंद्रिय शेतीला भविष्य, शेतकऱ्यांनी विचार करावा ; आमदार सचिन कल्याणशेट्टी ः कृषी विज्ञान केंद्रात तंत्रज्ञान महोत्सव

KVK Solapur Technology Festival : शेतकऱ्यांनी शेतीत रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करावा आणि सेंद्रिय शेतीकडे वळावे, माझ्या अनुभवातून हे सांगतो, भविष्यात सेंद्रिय शेतीलाच भविष्य असणार आहे, असे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
Organic Farming
Organic FarmingAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर ः शेतकऱ्यांनी शेतीत रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करावा आणि सेंद्रिय शेतीकडे वळावे, माझ्या अनुभवातून हे सांगतो, भविष्यात सेंद्रिय शेतीलाच भविष्य असणार आहे, असे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड अध्यक्षस्थानी होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक डॉ. एस. डी. गोरंटीवार या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ला.रा. तांबडे, सेंद्रिय शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी नागेश ननवरे, गंगाधर बिराजदार उपस्थित होते.

Organic Farming
Organic Farming : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे

आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, की शेतकऱ्यांना विविधप्रकारच्या शेती तंत्राची, नव्या संशोधनाची माहिती देत शेतकरी घडवण्याचे काम कृषी विज्ञान केंद्र करते आहे, हे कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांनीही बदलत्या परिस्थितीनुसार शेती करायला हवी, असे ते म्हणाले. श्री. गायकवाड म्हणाले, की कृषी विज्ञान केंद्र सर्व सामान्य शेतकऱ्यांना आपले वाटावे, अशा प्रकारे कार्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

त्यासाठीच विविध उपक्रम, कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांनी संपर्क, संवाद वाढवत आहोत, असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. तांबडे यांनी शेतकऱ्यांच्या सेवेत कार्यरत असताना शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविणे हा प्रमुख उद्देश ठेवला, त्याप्रमाणे तूर उत्पादक शेतकऱ्यांनी-यांनी एकरी २० क्विंटलपर्यंत मजल मारली. आर्या प्रकल्पातून ग्रामीण युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचे प्रकल्प उभारणीमध्ये सहयोग दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवारफेरीत ड्रोनफवारणीसह पीकप्रात्यक्षिके
या तंत्रज्ञान महोत्सवाच्या निमित्ताने शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये फुलांमध्ये झेंडूची मल्चिंगवरील लागवड व मल्चिंगविरहीत फळे व भाजीपालामध्ये खरबूज, कलिंगड, काकडी, शुगरबीट, मुळा, गाजर, पालक, वांगी, टोमॅटो, हुरड्याची, लाहयाची व इतर ज्वारीचे प्रकार, मधुमका, राळा, वरई, भगर, गहू, हरभरा, जवस, मोहरी, तीळ, इत्यादी पिकांची पीक प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखवण्यात आली. तसेच शेतकरी बांधवांना ड्रोनद्वारे प्रत्यक्ष फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com