Watermelon Processing : कलिंगडापासून जॅम, टॉफी

Watermelon Food : कलिंगडापासून जॅम, टॉफी आणि बार कशाप्रकारे बनवतात याबद्दलची माहिती या लेखातुन पाहुयात.
Watermelon Processing
Watermelon ProcessingAgrowon

Watermelon Food Processing :

जॅम : जॅम बनविण्यासाठी पूर्ण पक्व झालेल्या कलिंगड फळांचा १ किलो गर, साखर ७५० ग्रॅम, सायट्रिक ॲसिड ८ ग्रॅम इत्यादी गोष्टी लागतात.

सुरुवातीला पक्व कलिंगडाची फळे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर चाकूने कलिंगड फळे कापून त्यातील बी वेगळे करावे. फळाची साल बाजूला काढून गर व्यवस्थित मिक्सरमध्ये एकजीव करावा.

त्यानंतर गरामध्ये ७५० ग्रॅम साखर आणि ८ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून मिश्रण मंद आचेवर गरम करावे.

मिश्रण गरम करत असताना मिश्रणाचा टीएसएस ६८.५ टक्के इतका आल्यानंतर जॅम तयार झाला असे समजावे. जॅम थोडा थंड झाल्यावर निर्जंतुक काचेच्या बरण्यांमध्ये भरावा. बरणीवर थोडे पॅराफिन वॅक्स ओतावे. अशारीतीने उत्तम प्रतीचा टिकाऊ जॅम तयार होतो. बरण्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात. त्यामुळे जॅम चांगला राहतो.

Watermelon Processing
Watermelon Food Processing : कलिंगडापासून रस, सरबत आणि सिरप

बार : कलिंगड फळांचा १ किलो गर मिक्सरमधून बारीक करून घ्यावा. त्यानंतर गॅसवर मंद आचेवर कढई ठेवावी. कढईमध्ये कलिंगडाचा गर १ किलो व साखर ५००  ग्रॅम प्रमाणे मिसळून चांगली परतून घ्यावी. त्यात पेक्टिन ०.५८ ग्रॅम, सायट्रिक आम्ल ३० ग्रॅम, खाद्यरंग १० टक्के व पोटॅशिअम मेटाबाय सल्फाइट ३०० पीपीएम प्रमाणे टाकावे.

मंद आचेवर मिश्रण चांगले शिजू द्यावे. मिश्रण चांगले घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करावा. त्यानंतर एक ताट घेऊन त्यावर तुपाचा हात फिरवावा. त्यात वरील सर्व मिश्रण पसरून घ्यावे. मिश्रण थंड झाले की त्याच्या वड्या पाडाव्यात. त्यानंतर तूप लावलेल्या ट्रेमध्ये हे मिश्रण टाकून पापडी उलथवावी आणि पुन्हा १० ते १५ तास सुकवावे. नंतर योग्य आकाराचे तुकडे करून आकर्षक पॅकिंग करावे.

Watermelon Processing
Healthy Watermelon : आरोग्यदायी कलिंगड

टॉफी :

साहित्य : पल्प १ किलो, साखर ४०० ग्रॅम, लिक्विड ग्लुकोज ९० ग्रॅम, दूध पावडर ८० ग्रॅम, सायट्रिक आम्ल ४ ग्रॅम व वनस्पती तूप १२० ग्रॅम. कृती ः टॉफी बनविण्यासाठी पूर्ण पक्व झालेली कलिंगडाची निरोगी फळे निवडावीत. फळे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. त्यानंतर कलिंगडाचे तुकडे करून त्यापासून गर वेगळा करावा. गरातील बिया बाजूला काढाव्यात. गर भांड्यामध्ये घेऊन त्यात वनस्पती तूप मिसळून गॅसच्या मंद आचेवर चांगला शिजवून आटवावा.

त्यानंतर त्यात साखर, दूध पावडर, सायट्रिक आम्ल हे सर्व घटक टाकून मिश्रण एकजीव करावे. मंद आचेवर मिश्रण चांगले शिजवून घ्यावे. मिश्रण शिजत असताना मध्येमध्ये ढवळत राहावे. जेणेकरून करपणार नाही. शेवटी मिश्रणात लिक्विड ग्लुकोज मिसळून मिश्रणाचा ब्रिक्स ७० ते ७२ दरम्यान आल्यावर गॅस बंद करावा. मिश्रण तूप लावलेल्या ट्रे मध्ये किंवा प्लेटमध्ये ६ ते ८ तास पसरून ठेवावे. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे काप करावेत. तयार टॉफी बटर पेपरमध्ये पॅक करावी.

कृष्णा काळे, ८८०५९६८५३६ (लेखक अन्नप्रक्रिया विषयातील तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com