The Saints : राष्ट्रसंतांची शिकवण देशाला प्रगतीकडे नेणारी : वाघ

Prakash Wagh : राष्ट्रसंतांची ही शिकवणच देशाला प्रगतीकडे घेऊन जाणारी आहे,’’ असे मत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश महाराज वाघ यांनी व्यक्त केले.
Prakash Wagh
Prakash WaghAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : ‘‘अंधश्रद्घा, रूढी व परंपरा यापासून दूर राहून समर्पण भावनेने ईश्‍वराची सेवा करा. गाव, राष्ट्र व विश्‍वबंधुत्वासाठी तरुणांनी तळमळीने काम करावे. राष्ट्रसंतांची ही शिकवणच देशाला प्रगतीकडे घेऊन जाणारी आहे,’’ असे मत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश महाराज वाघ यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ आश्रमसंचालित श्री गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभाग यवतमाळतर्फे आयोजित वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी (ता. २९) आभासी पद्धतीने केले. त्या वेळी श्री. वाघ बोलत होते.

Prakash Wagh
Opportunities for Industrialization : संशोधनाच्या औद्योगिकीकरणास संधी

स्वागताध्यक्ष तथा आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून लक्ष्मण गमे, जनार्दन पंत बोधे, अंकुश रामगडे, दामोदर पाटील, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, पद्माकर ठाकरे, सूर्यप्रकाश जयस्वाल, प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे, डॉ. प्रशांत गावंडे, खुशाल ठाकरे, पद्माकर मलकापुरे आदी उपस्थित होते.

Prakash Wagh
Sugar Production : महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशचा साखर कोटा घटविला

श्री. वाघ म्हणाले, ‘‘राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहिताना गाव हाच विश्‍वाचा नकाशा हे तत्त्वज्ञान सांगितले. म्हणून ग्रामगीता घराघरांत कशी पोहोचेल, यासाठी प्रयत्न करावे. लोकप्रतिनिधींनी गावखेड्यात सामूदायिक प्रार्थनेसाठी समाज मंदिराची उभारणी करावी.’’

‘श्री क्षेत्र मोझरीला ‘अ’ वर्गाचा दर्जा’

‘‘राष्ट्रसंतांच्या विचारांवर मनापासून प्रेम करतो. त्यामुळे नागपूर विद्यापीठाला नाव देण्यासाठी संघर्ष केला. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असा नामविस्तार करून घेण्यात यश आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केवळ आध्यात्मिक विचार देणारे नव्हते, तर त्यांनी खऱ्या अर्थाने अध्यात्माला कृतीची जोड दिली. श्री क्षेत्र मोझरीला ‘अ’ वर्ग क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. राज्य सरकार लवकरच त्याची घोषणा करेल,’’ अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com