Shakuntala Railway : शकुंतला रेल्वे धावणार ब्रॉडगेज रुळावरून

Central Railway Update : शकुंतला रेल्वे आता नॅरोगेज लाइनवरून न धावता ती ब्रॉडगेजवरून धावणार आहे.
Shakuntala Railway
Shakuntala RailwayAgrowon
Published on
Updated on

Amravati News : शकुंतला रेल्वे आता नॅरोगेज लाइनवरून न धावता ती ब्रॉडगेजवरून धावणार आहे. त्यासाठी या संपूर्ण मार्गाचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम दिवाळीच्या अगोदरच पूर्ण झाल्याची माहिती भुसावळमध्ये रेल्वेच्या महाप्रबंधक इती पांडेय यांनी दिली. त्यामुळे आता लवकरच शकुंतलेच्या ब्रॉडगेजचे काम सुरू होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.

शकुंतला रेल्वे हे जुन्या काळातील चालते-बोलते प्रतीक मागील सहा वर्षांपासून दुरुस्तीच्या नावावर बंद होते. परंतु शकुंतला रेल्वे पुन्हा सुरू व्हावी, यासाठी रेल बचाव समितीच्या वतीने आजपर्यंत २४ वेळा विविध प्रकारची आंदोलने करून केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला गेला, पण सरकार काही जागे होईना.

Shakuntala Railway
Solapur Railway : सांगोला-मंगळवेढा-सोलापूर रेल्वेची गरज; खासदारांची शिफारस

मात्र रेल बचाव समितीकडून वाटेल ते झाले तरी चालेल, पण शकुंतला सुरू झालीच पाहिजे, यासाठी शकुंतलेचा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दरबारात पोहोचवला. अखेर शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीच्या आंदोलनाची दखल केंद्र आणि राज्य प्रशासनासह रेल मंत्रालयाने घेतली आहे. मात्र, शकुंतला नॅरोगेज मार्गावरून न धावता आता ती ब्रॉडगेजवरून धावणार आहे, यासाठी ड्रोनच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी या मार्गाचे संपूर्ण सर्वेक्षण झाले आहे.

पहिल्या टप्प्यात अचलपूर ते मूर्तिजापूर ७७ किमी, तर दुसऱ्या टप्प्यात मूर्तिजापूर ते यवतमाळ ११२ किमीचा मार्ग ब्रॉडगेज होणार आहे. यासाठी डिसेंबर महिन्यात मॅपिंग व डीपीआर पूर्ण करून केंद्रीय रेल बोर्डाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा भेटीदरम्यान महाप्रबंधक यांनी दिली. या वेळी शकुंतला रेल बचाव सत्याग्रही गजानन कोल्हे, योगेश खानजोडे, राजेंद्र जयसवाल, विजय गोंडचोर, संजय जोशी, राजेश शाह उपस्थित होते.

चांदूरबाजारपर्यंत जोडण्याची मागणी

शकुंतला रेल्वे आता ब्रॉडगेजवरून धावणार आहे. त्यासाठी १५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे शकुंतलेला चांदूरबाजारपर्यंत जोडण्याची मागणी रेल बचाव समितीकडून करण्यात आली आहे. त्यावर महाप्रबंधक इती पांडेय यांनीसुद्धा सकारात्मकता दाखविली असल्याची माहिती रेल बचाव समितीच्या वतीने देण्यात आली.

Shakuntala Railway
Rabi Crops Infestation : कोल्हापूर जिल्ह्यात रब्बी पिकांवर किडीचा प्रार्दुभाव, असे करा नियोजन
भुसावळ रेल्वेच्या महाप्रबंधकांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी शकुंतलेच्या मार्गाची ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण पूर्ण झाल्याची तथा अचलपूर ते यवतमाळ या मार्गासाठी पंधराशे कोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
योगेश खानझोडे, रेल बचाव समिती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com