DPDC Fund : जालना जिल्ह्याचे नियोजन बिघडले; निधी ३५ टक्केच खर्च

Jalna DPDC News ; जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून दरवर्षी नियोजन केले जाते.
Agriculture Fund
Agriculture FundAgrowon
Published on
Updated on

Jalna News : जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून दरवर्षी नियोजन केले जाते. मात्र, राज्याच्या सत्ताबदलानंतर मागील दोन वर्षांपासून जिल्हा नियोजन बिघडल्याचे चित्र आहे. यंदा जिल्ह्याच्या विकासासाठी ३२५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

त्यापैकी प्रत्यक्षात विकास कामांवर केवळ ११० कोटी ४४ लाख २३ हजारांचा निधी खर्च झाला आहे. त्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षभरातील विकासकामे पंधरा दिवसांत करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.

जिल्ह्यात नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार केला जातो. त्यानुसार जिल्ह्याच्या विकासकामांसाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली जाते. यंदाही जिल्ह्यात ३२५ कोटींच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र, जिल्हा नियोजन समितीच्या विकास कामांना गतीच मिळाली नाही.

Agriculture Fund
Sangli DPDC : जिल्हा नियोजनचे ४०५ कोटींपैकी ११३ कोटी खर्च

जिल्ह्याचे पालकमंत्री हे अतुल सावे आहेत. पालकमंत्री सावे हे इतर जिल्ह्यातील असल्याने जालना जिल्हा पालकमंत्री म्हणून त्यांना निर्णय घेताना राजकीय समतोल राखावा लागतो. यापूर्वीच त्यांना त्यांच्या मित्र पक्षाकडून जिल्ह्यात जोरदार विरोधही झाला होता.

Agriculture Fund
Pune DPDC Meeting : एक हजार १२८ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

त्यामुळे हा सर्व डोलारा संभाळत जिल्ह्यात विकास कामांना गती देण्याची वेळ पालकमंत्री सावे यांच्यावर आली होती. परिणामी जिल्हा नियोजन समितीच्या विकास कामांना गतीच मिळाली नाही. त्यामुळे ३२५ कोटींपैकी १४६ कोटी ६१ लाखांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तर ११० कोटी ४४ लाख २३ हजारांचा निधी आतापर्यंत विकास कामांवर खर्च झाला आहे.

जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या विकासकामांवर संपूर्ण निधी खर्च होईल. केवळ पाच ते दहा टक्के विकासकामांच्या खर्चास प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीसाठी गेलेल्या आहेत. त्या कामांना ही पुढील आठवड्यात प्रशासकीय मान्यता मिळेल. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विकास कामांवर शंभर टक्के निधी खर्च होईल.
- अतुल सावे, पालकमंत्री, जालना.
जिल्हा नियोजन समितीने ३२५ कोटींच्या विकास कामांचा आराखडा मंजूर केला होता. त्यानुसार आतापर्यंत १४६ कोटी ६१ लाखांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्य मिळाली असून निधी वर्ग केला आहे. त्यापैकी ११० कोटी ४४ लाख २३ हजारांचा निधी विकास कामांवर खर्च झाला आहे. कोणत्या हेडखाली विकास कामांसाठी किती निधी खर्च झाला याचा अहवाल अद्याप काढलेला नाही.
- सुनील सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com