MGNREGA : वीस हजारांहून अधिक मजुरांच्या हाताला काम

Rural Employment : सध्या या योजनेची ३,४०२ कामे सुरू आहेत. त्यात वैयक्तिक कामे व ‘मनरेगा’अंतर्गत ६७ कामे वैयक्तिक स्वरूपाची व १९७ कामे सार्वजनिक स्वरूपाची असे एकूण २६४ कामे हाती घेण्यात आली आहेत.
Rural Development
MGNREGAAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्यास्थितीत वीस हजारांहून अधिक मजूर काम करीत आहेत. गेल्या महिन्यात मजुरांची संख्या १५ हजारांपर्यंत होती. ती या महिन्यात २० हजार ८५६पर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात पावसाळ्यासह नोव्हेंबर ते डिसेंबर व जानेवारीपर्यंत मजूरांच्या हाताला काम मिळते.

जसजसे उन्हाळ्याचे दिवस तापायला लागतात, त्यानंतर ग्रामीण भागातील मजुरांना काम मिळणे दुरापास्त होते. त्यामुळे कुटुंबीयांचा चरितार्थ कसा व्यतित करावा, असा गंभीर प्रश्न मजुरांसमोर उभा राहतो. अशास्थितीत ग्रामीण भागात मजुरांना रोजगार उपलब्ध होऊन महात्मा गांधी योजना आधारवड ठरली आहे.

Rural Development
MGNREGA : जत तालुक्यात रोजगार हमी योजनेतून विकास प्रकल्प राबवणार

सध्या या योजनेची ३,४०२ कामे सुरू आहेत. त्यात वैयक्तिक कामे व ‘मनरेगा’अंतर्गत ६७ कामे वैयक्तिक स्वरूपाची व १९७ कामे सार्वजनिक स्वरूपाची असे एकूण २६४ कामे हाती घेण्यात आली आहेत. वैयक्तिक स्वरूपाच्या कामांत वैयक्तिक सिंचन विहिरी, गायगोठे, कुक्कुटपालन शेड, बांधावर फळबाग लागवड, जुनी भात खाचरे दुरुस्ती, शोषखड्डे, वैयक्तिक शौचालय, शेततळे, दगडी बांध, बांधावर वृक्ष लागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, तुती लागवड, विहीर पुनरर्भरण, प्रधानमंत्री आवास योजना,

इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे अकुशल काम, फळबाग लागवड, पडिक जमिनीवर वृक्षलागवड, रस्ता दुतर्फा, किनारपट्टीलगत, बांधावर आदी, सिंचन विहिरी, शेततळे, शोषखड्डे, कंपोस्ट खत, गांडूळ खत टाकी, अझोला खत, जैविक खतनिर्मित साचा, गुरांचा, शेळीचा गोठा, कुक्कुटपालन शेड, शेतबांध बंदिस्ती, रेशीम लागवड आदी कामांचा समावेश आहे.

Rural Development
MGNREGA Wages : सातारा जिल्ह्यात 'मनरेगा'च्या मजुरांची १५ कोटींची मजुरी थकली

सार्वजनिक कामे-‘मनरेगा’अंतर्गत सार्वजनिक स्वरुपाच्या कामांमध्ये रस्ते तयार करणे, सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक, सिमेंट नाला बांध, भूमिगत गटारी, खेळाचे मैदान, अशी कामे हाती घेण्यात आली आहेत.

मस्टर, आधारसिडींगनुसार बँक खात्यात मजुरी वर्ग

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. याअंतर्गत अकुशल कामगारांना रोजगार पुरविला जातो. यात १०० दिवसांपर्यंत रोजगाराची हमी केंद्र सरकार व त्यानंतरची राज्य सरकारची आहे. योजनेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत असून, लाभार्थी यांच्या बँक खात्यात त्यांच्या मजुरीची रक्कम जमा केली जाते. या कामांवर जळगाव जिल्ह्यात सध्यास्थितीत २० हजार ८५६ मजूर काम करीत आहेत.

अशी आहे मनरेगा मजूर स्थिती व कामे

जिल्ह्यात ग्रामपंचायतींची संख्या १,१८९

सद्यस्थितीत ६७८

ग्रामपंचायतींतर्गत सुरू असलेली कामे ३,४०२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com