MGNREGA Wages : सातारा जिल्ह्यात 'मनरेगा'च्या मजुरांची १५ कोटींची मजुरी थकली

Employment Guarantee Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) जिल्ह्यातील मजुरांची १५ कोटी ३४ लाख ८४ हजार ८०५ रुपयांची मजुरी शासनाकडे थकित आहे.
Rural Employment Guarantee Scheme
MGNREGA Worker Agrowon
Published on
Updated on

Nashik News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) जिल्ह्यातील मजुरांची १५ कोटी ३४ लाख ८४ हजार ८०५ रुपयांची मजुरी शासनाकडे थकित आहे. विशेष म्हणजे सिन्नर, सुरगाणा व येवला या तालुक्यांचे नोव्हेंबर-डिसेंबरपासूनचे अनुदान आलेले नाही. परिणामी काम करूनही मजुरी वेळेत हाती पडत नसल्याने मजुरांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

सरकारतर्फे मनरेगा योजनेतून ग्रामीण भागातील मजुरांना किमान शंभर दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. यंत्रणा स्तरावर व ग्रामपंचायत पातळीवर कामे हाती घेताना त्यावर मजुरांची नियुक्ती केली जाते.

Rural Employment Guarantee Scheme
MGNREGA Horticulture Cultivation: ‘रोहयो’च्या पाठबळाने ४०,८०० हेक्टरवर फळबाग लागवड, शेतकऱ्यांना नवा दिलासा!

प्रामुख्याने रस्त्यांची कामे, विहीर बांधणी, रोपवाटिका उभारणे, गोट फार्म, वृक्ष आणि फळबागा लागवड, घरकुल, शौचालये बांधणी, गाळ काढणे, अंगणवाडी भवन बांधणे यासह निरनिराळ्या प्रकारच्या कामांवर हे मजूर कार्यरत असतात.

सरकारतर्फे या मजुरांना २२० रुपये प्रतिदिन मजुरी देण्यात येते. गावपातळीवर कामे उपलब्ध होत असल्याने संपूर्ण कुटुंब मनरेगावर हजेरी लावते. मात्र, केंद्र सरकारकडून मजुरी वेळेत उपलब्ध होत नसल्याने मजुरांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते आहे.

राज्यात गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांपासून मनरेगा अनुदान उशिराने प्राप्त होत आहे. अद्याप हा गुंता सुटलेला नाही, मागील महिन्याचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त होणे बाकी आहे.

Rural Employment Guarantee Scheme
MGNREGA : जत तालुक्यात रोजगार हमी योजनेतून विकास प्रकल्प राबवणार

सरकारकडून टप्प्याटप्प्याने हे अनुदान वितरित केले जात आहे. लवकरच सर्व अनुदान उपलब्ध होईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, रोजगाराची हमी देणारे शासनच विलंबाने अनुदान देत असल्याने घरातील चूल कशी पेटवायची, असा प्रश्न मजुरांना भेडसावत आहे.

जिल्ह्यातील ‘मनरेगा’ची स्थिती

तालुका थकित रक्कम (कोटींत)

बागलाण १,२५,४१,७४३

चांदवड १५,७८,६६७

देवळा ३९,६३,३४८

दिंडोरी १,०१,४८,९७६

इगतपुरी १,०२,२२,१६७

कळवण ६९,३९,८६५

मालेगाव २,१७,३६,९९१

नांदगाव ४७,१२,४८०

नाशिक ४५,७८,१५३

निफाड १,४९,३९,६७५

पेठ १,६२,४१,६०७

सिन्नर ५९,३८,४५७

सुरगाणा २,१४,४४,३१८

त्र्यंबकेश्वर ६८,१७,६८६

येवला १,१६,८०,६७२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com