
Akola News : ग्रामीण गृहनिर्माण योजनेत १०० दिवसांचे उद्दिष्ट पूर्ण करून अकोला जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. उद्दिष्टाच्या १८३ टक्के काम करून साडेचार हजारांवर घरकुले पूर्ण केली आहेत. शासनाच्या १०० दिवस कार्यक्रमात महाआवास अभियान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करताना ग्रामीण भागात जिल्ह्याचे दोन हजार ५१६ उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.
ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील २७ हजार ४१३ लाभार्थींना घरकुल मंजुरीपत्र व २१ हजार ६२७ लाभार्थींना पहिला हप्त्याचे वितरण राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते झाले होते. महाआवास योजनेत अधिकाधिक घरे पूर्ण करून गरजूंना लाभ मिळवून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार प्रक्रिया गतीने राबविण्यात आली.
या प्रक्रियेत घरकुलांना मंजुरी देणे, प्रथम हप्ता वितरित करणे, घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करणे, घरकुल बांधकाम पूर्ण करणे असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. प्रशासनाकडून कामाला गती देत उद्दिष्टापलीकडे जाऊन एकूण चार हजार ६०० घरकुले पूर्ण करण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामीण गृहनिर्माण संचालक कार्यालयाकडून जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले आहे.
राज्यात रत्नागिरी जिल्ह्याने प्रथम व अकोला जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळणार असल्याने त्यांचे जीवनमान सुरक्षित आणि स्थिर होण्यासाठी मदत होणार आहे.
पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या मार्गदर्शनात प्रकल्प संचालक मनोज जाधव, जिल्हा प्रोग्रामर, जिल्हा ऑपरेटर यांच्यासह गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, घरकुल ऑपरेटर गावस्तरावर सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, रोजगार सेवक आदी परिश्रम घेत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.