Coffee Plant : जैन इरिगेशन करणार कॉफीचे टिश्‍युकल्चर विकसित

Coffee Tissue Culture : जैन इरिगेशन कंपनीने कॉफी पिकामध्ये उतिसंवर्धित रोपे किंवा टिश्युकल्चर तंत्रज्ञान विकसित केले आहे. टिश्युकल्चर पद्धतीने कॉफी रोपांची उपलब्धता व्यावसायिक तत्त्वावर केली जाणार आहे.
Jain Irrigation
Jain IrrigationAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जैन इरिगेशन कंपनीने कॉफी पिकामध्ये उतिसंवर्धित रोपे किंवा टिश्युकल्चर तंत्रज्ञान विकसित केले आहे. टिश्युकल्चर पद्धतीने कॉफी रोपांची उपलब्धता व्यावसायिक तत्त्वावर केली जाणार आहे. यासंबंधीचा सामंजस्य करार भारत सरकारच्या कॉफी बोर्डासोबत नुकताच करण्यात आला.

याअंतर्गत रोबस्टा आणि अरेबिका कुळातील उच्च उत्पन्न देणाऱ्या कॉफीच्या सात वाणांची टिश्युक्लचर पद्धतीने निर्मित रोपांची उपलब्धता करण्यात येणार आहे. तसा परवाना भारत सरकारच्या कॉफी बोर्डाने जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला बहाल केला आहे.

कॉफीची उतिसंवर्धित रोपे तयार करणारी जैन इरिगेशन ही कंपनी जगातील पहिलीच ठरली आहे. भारत हा जगात कॉफी उत्पादनाचा प्रमुख निर्यातदार देश असून टिश्युकल्चरच्या रोपांमुळे निर्यातक्षम उत्पादनाला आणखी चालना मिळेल, असा विश्‍वास जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी करारावेळी व्यक्त केला.

Jain Irrigation
Agricultural Subsidy : ठिबक, तुषार संचाचे १६ कोटींवर अनुदान प्रलंबित

जैन टिश्युकल्चर कॉफी रोपे ही गुणवत्तापूर्ण मातृवृक्षांपासून तयार केली जातात. उच्च उत्पन्न, उत्कृष्ट सुगंध गुणवत्ता आणि रोपांचा संतुलित घेर व आकार या परिमाणांवर निवडलेली असतात. टिश्युकल्चर निर्मित कॉफी रोपे ही व्हायरस फ्री, कार्यक्षम आणि आनुवंशिकदृष्ट्या एकसारखी असतात. कॉफीच्या शाश्‍वत शेतीसाठी टिश्युकल्चर रोपांची लागवड नक्कीच उपयुक्त ठरेल.

Jain Irrigation
Agriculture Award : तिजोरीत शेतकऱ्यांच्या पुरस्कारासाठी पैसै नसतील तर आमदारांचे वेतन थांबवा; शेट्टी यांचा सरकारवर निशाना

भारतात सध्या जुन्या पद्धतीने कॉफी रोपांची लागवड करण्यात येते. यात दर्जेदार रोपे आणि प्रगत, तंत्रज्ञानाची उणीव जाणवते. त्यामुळे नवीन विकसित कॉफी टिश्युकल्चर रोपांचे विविध फायदे कॉफी उत्पादकास मिळतील. यामुळे भारत व इतर देशांमध्ये कॉफी उद्योगाला निश्चित चालना मिळेल, असा विश्‍वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ला टिश्युकल्चर निर्मित कॉफी रोपे जगासमोर आणताना अत्यंत अभिमान वाटतो आहे. रोगमुक्त, आनुवंशिकदृष्ट्या एकसमान आणि अधिकचे उत्पन्न देणारी, असे विविध वैशिष्ट्ये असलेली कॉफीची टिश्युकल्चर रोपे भारतीय कॉफी उत्पादकांना समृद्धी देईल.
- अजित जैन, सहव्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.
जगात प्रथमच जैन इरिगेशनच्या माध्यमातून भारतात कॉफीसाठी टिश्युकल्चर तंत्रज्ञान प्रमाणित केले आहे. या टिश्युकल्चर तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती केलेल्या कॉफी रोपांचे शेतात मूल्यांकन केले गेले आहे.
- के. जी. जगदीशा, सचिव व सीईओ, कॉफी बोर्ड, भारत सरकार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com