Coffee Cultivation : आता चहापेक्षा 'कॉफी'ची वाढली मागणी, पण कशी करायची लागवड?
Coffee Farming : आजकाल भारतात चहापेक्षा 'कॉफी' अधिक लोकप्रिय होत आहे. आपल्या देशात चहा पिणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. मागील काही वर्षांत तरुणांमध्ये कॉफी पिण्याची क्रेझ वाढली आहे. ऑफिस असो की घर, तरुणाई चहापेक्षा कॉफी पिण्याला जास्त पसंती देत आहे. तुम्हीही कॉफीची शेती करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला माहिती आहे का की त्याची सर्वाधिक लागवड कुठे आणि कशी केली जाते?
कॉफीची लागवड प्रामुख्याने डोंगराळ भागात केली जाते. भारतात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रामध्ये त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.
कशी करायची कॉफीची लागवड ?
कॉफीची लागवड प्रामुख्याने डोंगराळ भागात केली जाते. त्याची मशागत करण्यासाठी प्रथम नांगरणी करून माती भुसभुशीत केली जाते. त्यानंतर चार ते पाच मीटरची सरी आणि त्याच अंतरावर खड्डे काढले जातात. त्यामध्ये काॅफीची रोपे लावण्याचे काम सुरू होते. त्याचबरोबर सेंद्रिय व रासायनिक खते जमिनीत मिसळून खड्ड्यात टाकली जातात. त्यानंतर सर्व खड्डे भरल्यानंतर सिंचनाची प्रक्रिया होते.
कॉफीच्या लागवडीसाठी 150-200 सेमी पावसाची आवश्यकता असते. त्याच वेळी, थंडीचा हंगाम कॉफीसाठी योग्य नाही. अशा वातावरणात झाडे वाढत नाहीत. त्याची झाडे उन्हाळ्यात 30 अंश आणि हिवाळ्यात 15 अंशांपर्यंत तापमान सहन करू शकतात. आजकाल भारतात कॉफीचे अनेक प्रकार घेतले जात असले तरी केंट कॉफी ही सर्वात जुनी आहे. केरळमध्ये याचे सर्वाधिक उत्पादन होते.
त्याच्या लागवडीतून अनेक शेतकरी श्रीमंत झाले आहेत. तर, अरेबिका कॉफी आपल्या देशात सर्वोत्तम मानली जाते. कर्नाटकात याचे सर्वाधिक उत्पादन होते. 70 टक्के अरेबिका कॉफी एकट्या या राज्यात घेतली जाते. याशिवाय उत्पादनानंतर ते परदेशातही पाठवले जाते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.