Cotton Consumption : सर्वाधिक कापूस वापराचे ठरले दुसरे वर्ष

Cotton Market : कापड उद्योगांसाठी पुरेसा कच्चा माल उपलब्ध आहे. कापसाचा वापर वाढला असून, गेल्या दहा वर्षांत यंदाचे वर्ष सर्वाधिक वापराचे दुसरे वर्ष ठरले आहे.
Textile Commissioner Roop Rashi and Cotton Corporation of India Ltd. Chairman and Managing Director Lalit Kumar Gupta
Textile Commissioner Roop Rashi and Cotton Corporation of India Ltd. Chairman and Managing Director Lalit Kumar GuptaAgrowon
Published on
Updated on

New Delhi : कापड उद्योगांसाठी पुरेसा कच्चा माल उपलब्ध आहे. कापसाचा वापर वाढला असून, गेल्या दहा वर्षांत यंदाचे वर्ष सर्वाधिक वापराचे दुसरे वर्ष ठरले आहे. उद्योग सुयोग्य मार्गावर वाटचाल करत असून, आकडेवारीतून चांगला वापर झाल्याचे दिसून येईल, अशी आम्हाला आशा आहे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी यांनी पत्रकार परिषदेत केले.

कापूस उत्पादन व वापर समितीची (सीओसीपीसी) २०२३-२४ च्या कापूस हंगामासाठीची तिसरी बैठक सोमवारी (ता. २४) वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग मंत्रालयात पार पडली. या प्रसंगी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार गुप्ता उपस्थित होते.

Textile Commissioner Roop Rashi and Cotton Corporation of India Ltd. Chairman and Managing Director Lalit Kumar Gupta
Cotton Fertilizers : कपाशीला द्या संतुलित खते

केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्यासह कापड उद्योजकांचे प्रतिनिधी, कापूस व्यापार व जिनिंग, प्रेसिंग क्षेत्राचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. राज्यनिहाय कापसाखालील क्षेत्र, उत्पादन, आयात, निर्यात आणि कापसाचा वापर या बाबींवर बैठकीत चर्चा झाली.

Textile Commissioner Roop Rashi and Cotton Corporation of India Ltd. Chairman and Managing Director Lalit Kumar Gupta
Cotton Cultivation: महाराष्ट्रात कापूस लागवड यंदा १५ टक्क्यांनी घटणार

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.चे गुप्ता यांनी सांगितले, की पारदर्शकता आणि चांगल्या कापसाच्या पुरवठ्यासाठी कापसाच्या प्रत्येक गासडीचा क्यूआर कोडच्या आधारे मागोवा घेतला जाईल. त्यामध्ये कोणत्या गावातून कापूस आला, कोणत्या कारखान्यात त्यावर प्रक्रिया झाली आणि विक्रीची तारीख या माहितीचा समावेश असेल.

कापसाचा ताळेबंद (सर्व बाबी लाख गाठींमध्ये)

मुद्दे २०२२-२३ २०२३ -२४ (अपेक्षित)

सुरुवातीचा साठा ३९.४८ ६१.१६

उत्पादन ३३६.७ ३२५.२२

आयात १४.६० १२

एकूण पुरवठा ३९०.६८ ३९८.३८

वस्त्र उद्योगातील वापर १९७.८० २०४

लघू उद्योगातील वापर ९९.८३ १०३

बिगर वस्त्र उद्योगातील वापर १६ १६

निर्यात १५.८९ २८

एकूण मागणी ३२९.५२ ३५१

अखेरचा साठा ६१.१६ ४७.३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com