Balapur Water Yojana : वाण प्रकल्पातूनच बाळापूर योजनेला पाणी मिळणे गरजेचे

Irrigation Update : अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात येत असलेल्या बाळापूर-अकोला तालुक्यातील ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेला वाण प्रकल्पातून पाणी देण्यावरून गेल्या काळात मोठ्या प्रमाणात विरोध केला गेला. यावर शासनाने स्थगितीही दिली.
water
waterAgrowon

Akola News : अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात येत असलेल्या बाळापूर-अकोला तालुक्यातील ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेला वाण प्रकल्पातून पाणी देण्यावरून गेल्या काळात मोठ्या प्रमाणात विरोध केला गेला. यावर शासनाने स्थगितीही दिली.

मात्र आता तेल्हारा तालुक्यात असलेल्या या वाण प्रकल्पातूनच पाणीपुरवठा करणे योग्य राहील, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे पाठवल्याची माहिती मिळाली आहे. हा अहवाल शासनाने स्वीकारला तर या योजनेसाठी पाणी आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. आता राज्य सरकारच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ६९ खेडी पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली होती. बाळापूर तालुक्यातील ५६ व अकोला तालुक्यातील १३ गावांचा यात समावेश आहे.

या योजनेसाठी वाण प्रकल्पावरून पाणी आरक्षित करण्यात आले. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध केला. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तापालट होऊन शिंदे-फडणवीस सरकार आले.

water
Water Management : नाशिकमधील वाद-वराडी गावच्या जल व्यवस्थापनातून मिटला पाणीप्रश्‍न

या सरकारने ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठीचा वाण प्रकल्पात आरक्षित केलेला पाणीसाठा स्थगित केला. त्यामुळे या पाणीपुरवठा योजनेलाही स्थगिती मिळाली. आमदार देशमुख यांनी अकोला ते नागपूर पायदळ यात्रा काढून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर धडक देण्याचा प्रयत्नही केला.

मध्यंतरी शासनाने अकोला जिल्हाधिकाऱ्यांना योजनेसाठी पाणी आरक्षित करण्यासंदर्भातील अहवाल मागितला. तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच शासनाला दिला. या अहवालात त्यांनी वाण प्रकल्पातून ६९ खेडी योजनेला ३.३५ दलघमी वार्षिक पाणी आरक्षित आहे.

वाण प्रकल्पाशिवाय पाण्याचे इतर स्रोत १०० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहेत. या धरणावरून पाणी घेतल्यास ६९ गावांपैकी ६४ गावांना पाणीपुरवठा शक्य आहे. त्यामुळे योजनेच्या खर्चात बचत होते. योजनेचे ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. ६९ गावे ही खारपाणपट्ट्यातील असून, या भागात पिण्यायोग्य पाण्याचे स्रोत कमी आहेत.

वाण प्रकल्पावरून ही योजना झाल्यास ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल. त्यामुळे या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी आरक्षण कायम ठेवणे व योजना पूर्ण होणे योग्य राहील, असे मत जिल्हा प्रशासनाच्या वतीने अहवालात व्यक्त केल्याचेही समजते.

water
Water Shortage : भूगर्भातील पाणी पातळी खालावली

वाण प्रकल्पातून मागील पाच वर्षांतील सिंचन

२०१७-१८ - ५८८१.९ हेक्टर

२०१८-१९- ११३४७ हेक्टर

२०१९-२० - ११७५८ हेक्टर

२०२०-२१- १०६५२ हेक्टर

२०२१-२२ - ९१०८८ हेक्टर

वाण प्रकल्पातील सध्याचे पाणी आरक्षण

तेल्हारा पाणीपुरवठा योजना - १.३७३८ दलघमी

अकोट पाणीपुरवठा योजना - २.७१९८ दलघमी

शेगाव पाणीपुरवठा योजना - ३.३४४१ दलघमी

८४ खेडी पाणीपुरवठा योजना- ६.३४६९ दलघमी

जळगाव व १४० खेडी पा.पु.यो. - ४.४७ दलघमी

एकूण - १८.२५१६ दलघमी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com