
Pune News : छोट्या शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून कंपनी सह्याद्री फार्मसोबत एकत्रित काम करत आहे. सह्याद्री फार्मसारख्या यशस्वी शेतकरी उत्पादक कंपन्या राज्यभरात उभ्या राहाव्यात, असा प्रयत्न राज्य व केंद्र शासनाचा कृषी विभाग करीत आहे. या कंपन्यांनी पीकनिहाय मूल्यसाखळी उभी करणे गरजेचे आहे. याकरिता संघटित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत सह्याद्री फार्मचे संचालक मंगेश भास्कर यांनी व्यक्त केले.
डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, सह्याद्री फार्म व अभिनव कृषी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी आणि शाश्वत फार्मिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर- आंबेगाव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केळी पीक अभ्यास दौरा गुरुवारी (ता.३१) शुक्रवारी (ता.१) आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी श्री. भास्कर बोलत होते. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख कृषी रत्न अनिल मेहेर, अखिल भारतीय भाजीपाला संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे, शेतीतज्ज्ञ संतोष सहाणे, डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक अजय बेल्हेकर, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सूर्यकांत विरनक, सुनील वामन, संतोष टिकेकर, भानुविलास गाढवे, दत्ता हांडे, रवींद्र थोरात, दीपक कोकणे, विनायक गाढवे, ऋतुपर्ण मेहेर, राहुल दांगट, धनंजय ताजवे, संदीप काकडे, विनायक मुळे या वेळी उपस्थित होते.
श्री. भास्कर म्हणाले, की जुन्नर तालुका हा बारमाही पाणी असणारा तालुका आहे. तालुक्याचे हवामान फळपिकास पोषक आहे. येथील शेतकरी हा भरपूर कष्टाळू आहे. ऊस शेतीला भरपूर प्रमाणात पाणी लागते. या पिकाला पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी केळी या नगदी पिकाकडे शेतकऱ्यांनी पाहावे.
फळपिके ही शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत स्वतःची ओळख तयार करण्यासाठी पूरकपीक पद्धती आहे. यामध्ये आपण पायाभूत सुविधा तयार केल्यास, निर्यातीद्वारे मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपल्या देशात येण्यास मदत होऊन राहणीमान उंचाविण्यास मदत होईल.
डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक अजय बेल्हेकर म्हणाले, की कंपनीतर्फे एकाच छताखाली लागवडीपासून विक्रीपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच विक्री व्यवस्थापनसाठी ब्लॉकचैन पद्धतीचा वापर करून सर्व व्यवहार डिजिटल स्वरूपात करणार आहे.
शहरी ग्राहकांना, कंपनी रेसिड्यू फ्री अन्न पुरवठा, पिकाचे उगमस्थान व उत्पादन प्रक्रियामधील तपशील उपलब्ध करून देण्यात येईल. अभ्यासदौऱ्यात प्रास्ताविक शाश्वत शेती फाउंडेशनचे शिवाजी कांबळे यांनी केले. तर विनायक मुळे यांनी आभार व्यक्त केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.