Forest Fire : सातपुड्यात वणव्याच्या घटनांमुळे वृक्षांची हानी

Forest Department : खानदेशात सातपुडा पर्वतात वणवे पेटू लागले आहेत. यात वृक्षांची मोठी हानी होत आहे.
Forest Fire
Forest FireAgrowon

Jalgaon News : खानदेशात सातपुडा पर्वतात वणवे पेटू लागले आहेत. यात वृक्षांची मोठी हानी होत आहे. वन विभाग याबाबत प्रभावी उपाययोजना करीत नसल्याने समस्या वाढली आहे. हिरव्यागार झाडाझुडपांनी बहरलेल्या डोंगररांगा हेच खानदेशाचे वैभव आहे. हे वैभव टिकविण्याची जबाबदारी सर्वांचीच असून, यामध्ये अधिक महत्त्वाची जबाबदारी वन विभागाची आहे.

मात्र वन विभागाच्या नाकर्तेपणामुळे डोंगररांगांना दरवर्षी वणवे लागून वन्यप्राण्यांसह वृक्षसंपदेची अपरिमित हानी होत आहे. गेल्या काही वर्षांपासून सातपुडा पर्वतावर कुठे ना कुठे वणवा लागत आहे. यामुळे डोंगरावर आगीचे लोळ उठताना दिसून येतात.

Forest Fire
Forest Fire : वणव्यामुळे निसर्गसंपदा धोक्यात

या भीषण आगीत गवताची राख झाली, वनऔषधी करपल्या, वन्यप्राण्यांची निवासस्थाने नष्ट होऊन चिमुकल्या प्राण्यांची पिले होरपळून गेली. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी वारंवार वणवे लागण्याच्या घटना घडत आहेत.

जंगलात डिंक गोळा करण्यासाठी गेलेल्या व शिकाऱ्यांकडून बिडी, सिगारेटमुळे किंवा परस्परविरोधातून या आगी लावल्या जात असल्याचे वन विभागाकडून सांगून सारवासारव करण्यात येत असते.

दरवर्षी वन विभागाच्या यावल व चोपडा परिक्षेत्रामध्ये वणवे लागत आहेत. वणवे रोखण्यासाठी वन विभागाकडून उपाययोजना गरजेची असली तरी कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने सातपुडा पर्वत वणव्यापासून सुरक्षित राहिला नसल्याचे निसर्गप्रेमींकडून बोलले जात आहे.

वन विभागामध्ये वनालगतच्या गावांमध्ये वन व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तरीही वणवे लागून अपरिमित हानी टाळण्यास वन विभागाला अपयश येत आहे. काळाची गरज म्हणून डोंगररांगांना लागणारे वणवे थांबवण्यासाठी वन विभागाने यापुढे काही तरी वेगळा उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे.

Forest Fire
Forest Fire : वणवा लावल्यास दोन वर्षांची शिक्षा

डिंक, जमिनी मिळविण्यासाठी आगी

सातपुडा पर्वत खानदेशात नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात आहे. जळगावातील रावेर, यावल व चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी तालुक्यांत सातपुडा पर्वतरांगा आहेत.

या भागात सध्या रोज आगीचे वणवे पर्वतात दिसतात. सातपुड्यातील वनसंपदा नष्ट होत आहे. काही माफिया, चोरटे डिंक मिळविण्यासाठी आगी लावतात. तर काही जण जमिनींवर अतिक्रमण करण्यासाठी आग लावतात, असाही आरोप केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com