Irrigation Project : निम्नपेढी प्रकल्प अडकला लालफितशाहीत

Nimna Pedhi Irrigation Project : सिंचन सुविधा वाढीसाठी प्रकल्पांची घोषणा केली जाते. मात्र यातून कंत्राटदाराचे हित जपता यावे याकरिता रखडत ठेवला जातो.
Agriculture Irrigation Project
Irrigation Project Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : सिंचन सुविधा वाढीसाठी प्रकल्पांची घोषणा केली जाते. मात्र यातून कंत्राटदाराचे हित जपता यावे याकरिता रखडत ठेवला जातो. निम्नपेढी देखील असाच लालफितशाहीत अडकला असून २००८ पासून यावर सुमारे २ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

विदर्भात सिंचन सुविधांचा नावावर प्रकल्पांची घोषणा केली जाते. त्यानंतर मात्र हे प्रकल्प वर्षानुवर्षे पूर्ण केले जात नाही. परिणामी प्रकल्पाच्या मुळ किंमतीत मोठी वाढ होते, असाच अनुभव आहे. निम्न पेढी प्रकल्प देखील असाच २००८ मध्ये सुरु करण्यात आला.

Agriculture Irrigation Project
Padalse Irrigation Project : सुधारित मान्यतेनंतरही पाडळसे प्रकल्पाचे भिजत घोंगडे

या प्रकल्पाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तसेच अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या खारपणपट्टयातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळणार होते. सुमारे १२ हजार २३० हेक्‍टर इतकी सिंचन क्षमता या प्रकल्पातून अपेक्षीत होती. भातकुली तालुक्‍यातील पाच गावांचे भूसंपादन तसेच १९ गावातील २५३५ हेक्‍टर जमीन याकरिता संपादित करण्याचे प्रस्तावीत होते.

२००८ साली सुरु झालेल्या या प्रकल्पाची मुळ किंमत अवघी १६१ कोटी रुपये इतकी होती. मात्र नियोजित वेळेत प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळे गेल्या १६ ते १७ वर्षात या प्रकल्पाची किंमत २ हजार कोटी रुपयांवर पोहचली आहे. प्रकल्पाबधीत गावातील दोन हजार पेक्षा अधिक कुटुंब बाधित झाली आहेत.

Agriculture Irrigation Project
Lower Terna Irrigation Project : निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेला गती ; दुरुस्तीच्या पहिल्या निविदेला मंजुरी

त्यातील बहुतांश भूमिहीन झाली. परंतु अद्यापही १२३० हेक्‍टरवरील सिंचनाचे स्वप्न पूर्णत्वास गेले नाही. प्रत्यक्ष सिंचन केव्हा होईल, कालव्यातून पाणी केव्हा सोडले जाईल, हे अधिकारी देखील सांगू शकत नाहीत. पुनर्वसनाचा प्रश्‍न निकाली न निघाल्याने हे काम रखडल्याच दावा केला जात आहे.

भातकुली मूर्तीजापूरातील क्षेत्र येणार ओलातीखाली...

भातकुली तालुक्‍यातील निंभा येथे प्रस्तावित निम्न पेढी प्रकल्पाच्या माध्यमातून भातकुली तालुक्यातील ३९, मूर्तीजापूर तालुक्‍यातील सहा गावातील १२ हजार २३० हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

पाटबंधारे विभागाची यंत्रणा, कंत्राटदार अशी साखळीच तयार झाली आहे. प्रकल्प पूर्णत्वास गेला तर देखभाल, दुरुस्तीच्या नावावर पैसे ओरबडता येत नाहीत. म्हणून तो रखडत ठेवला जातो. यातून एकमेकांचे हित जपण्याला प्राधान्य राहते. त्यामुळे प्रकल्पांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट होण्याची गरज आहे.
- जगदीश नरवाडे, अध्यक्ष, जनआंदोलन आधार संघर्ष समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com