
Amaravati News : पूर्ण झालेल्या प्रकल्पांची त्रयस्त संस्थेमार्फत तपासणी व लेखा परीक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये काहीजरी गडबड किंवा गैरव्यवहार आढळला तर मुख्य अभियंत्यासह अधीक्षक अभियंता, उपअभियंता व अभियंत्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा दम शनिवारी (ता. २२) पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलसपंदा विभागाच्या अधिकाऱ्यांना भरला. याबरोबरच जलसंधारणाअंतर्गत जुनी कामे पुन्हा जिवंत करण्यावर खर्च करण्यास सांगून नवीन सध्या प्रस्तावित न करण्याच्या सूचना दिल्यात.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलसंपदा विभागात आढावा बैठक घेत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची माहिती जाणून घेतली. या वेळी आमदार राजेश वानखडे, आमदार रवी राणा, प्रवीण तायडे, केवलराम काळे, चंदू यावलकर व माजी आमदार प्रवीण पोटे उपस्थित होते. बळीराजा जलसंजिवन योजनेअंतर्गत २८ पैकी १६ प्रकल्प पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.
उर्वरित प्रकल्प जून २०२६ पर्यंत करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. पूर्ण झालेल्या प्रकल्पांची तपासणी व ऑडीट त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येणार असल्याचे सांगतानाच पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देताना काही गडबड झाली असल्यास ती महिनाभरात दुरुस्त करा, त्यानंतर थेट कारवाई करण्याचा दम पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना भरला. या अधिकाऱ्यांच्या दोन वतेनश्रेणी बाद करण्यात येऊन त्यांची लाचलुचपत विभाग व आर्थिक अन्वेषन विभागाकडून चौकशी प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
बांधकामाधीन आठ प्रकल्प असून ते २०२५ व २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. जलसंधारणाची नवीन कामे करण्यावर खर्च करण्याऐवजी जुने प्रकल्प जिवंत करून सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी या वेळी केली.
काही प्रकल्पांमध्ये पुनर्वसनाचा प्रश्न असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनासा आणून देण्यात आले. त्यावर दर्जेदार पुनर्वसनासाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचना त्यांनी केली. ज्या ठिकाणी ॲवॉर्ड झाले आहेत तेथील निधी वितरित करण्यासही त्यांनी सांगितले. याबरोबरच अधिक निधीची गरज असल्यास प्रस्ताव पाठवा अधिवेशनात मांडून तो मंजूर करून घेण्याची ग्वाही त्यांनी दिली.
आमदारांना सूचना
आमदारांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी प्रकल्पांच्या ठिकाणी मुक्कामी जावे. गावकऱ्यांसमवेत चर्चा करून माहिती मिळवावी व प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी केल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.