Dhule Irrigation Projects : धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांतील गाळ ठरतोय डोकेदुखी ; साक्रीतील सर्वच धरणांत सुमारे ५० टक्के गाळ

Dhule Water Storage : जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांत गाळ साचला आहे. यामुळे सिंचन प्रकल्प उन्हाळ्याच्या मध्यात किंवा एप्रिलमध्येच कोरडे होतात किंवा त्यातील जलसाठा कमी होतो. हा गाळ काढून प्रकल्प कसे १०० टक्के पाण्याच्या क्षमतेने भरतील, असाही मुद्दा आहे.
Dhule Irrigation Projects
Dhule Irrigation Projects Agrowon
Published on
Updated on

Dhule News : धुळे ः  जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांत गाळ साचला आहे. यामुळे सिंचन प्रकल्प उन्हाळ्याच्या मध्यात किंवा एप्रिलमध्येच कोरडे होतात किंवा त्यातील जलसाठा कमी होतो. हा गाळ काढून प्रकल्प कसे १०० टक्के पाण्याच्या क्षमतेने भरतील, असाही मुद्दा आहे.  
शिरपुरातील अनेर, धुळे तालुक्यातील सोनवद, शिंदखेड्यातील अमरावती आदी प्रकल्पांतही गाळ आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे अनेकदा दुष्काळाचे सावट असते.

यंदा पाऊस झाला. पण सिंचन प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा आहे, अशी स्थिती नाही. कारण प्रकल्पांत गाळ आहे.  आपत्तीमुळेच नव्हे तर शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे जलसंकट तयार होते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. कारण दर वर्षी सिंचन प्रकल्पांतील गाळ वाढत आहे. मध्यम, लहान-मोठ्या प्रकल्पांतील गाळ काढणे आवश्यक आहे. साक्री तालुक्यातील सर्वच लहान-मोठ्या धरणांत सुमारे ५० टक्के गाळ साचल्याची स्थिती आहे.

Dhule Irrigation Projects
Irrigation Project Storage : धुळ्यातील अनेक सिंचन प्रकल्पांत साचला गाळ

गेल्या वर्षी गाळामुळे जलसाठा संपुष्टात आला. दुष्काळाचे चटके अधिकच सहन करण्याची वेळ आली. हे. गाळ अधिक साचल्यामुळे पाणीसाठा कमी असतो. दरवर्षी पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली असल्याची स्थिती अनेक भागात आहे. गाळ काढण्यासाठी शासनाची उदासीनता दिसून येते. शासनाने ‘गाळमुक्त धरण’ अशी अभिनव योजना आणली होती. शासनाच्या अनेक योजना कल्याणकारी असतात यात शंकाच नाही.

पण राबविणारी यंत्रणा, अधिकारी यांनी पोटतिडकीने काम करणे आवश्यक असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.  गाळमुक्त धरण योजनेत शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चात गाळ काढून न्यावा अशी तरतूद होती. पण त्याबाबत सध्या कुठेही सकारात्मक चित्र शासनस्तरावर दिसत नाही.

गाळाचा खर्च न परवडणारा
गेल्या वेळेस फेब्रुवारी महिन्यात साक्री तालुक्यातील तीन मध्यम व आठ लघु प्रकल्प मिळून एकत्रित सरासरी केवळ ३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. आहे. साक्री तालुक्यात आदिवासी भागातील काबऱ्याखडक, लाटीपाडा, मालनगाव, जामखेली यांसारखे प्रकल्प आहेत. धरण क्षेत्राजवळ असलेल्या आदिवासी बांधवांना गाळ काढून नेण्यासाठीचा खर्च न परवडणारा आहे.  शासकीय मदत मिळाल्यास गाळमुक्त धरण योजनेस बळ मिळणार आहे. तालुक्यात प्रमुख तीन मध्यम, तर आठ लघु प्रकल्प आहेत. सद्यःस्थितीत पिंपळनेरच्या लाटीपाडा प्रकल्पाची पाणीसाठ्याची क्षमता १,२५८ एमसीएफटी आहे. पण एवढे पाणी त्यात साचत नाही. मालनगाव प्रकल्पाची पाणीसाठ्याची क्षमता ४१० एमसीएफटी असून, प्रत्यक्षात एवढा जलसाठा चांगला पाऊस झाल्यानंतरही नसतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com