Milk Market
Milk MarketAgrowon

Milk Market : हैदराबाद बाजारात ‘गोदरेज माय फार्म मिल्क’ सादर

Godrej My Farm Milk Premium : भारतात वैविध्यपूर्ण कृषी व्यवसायात कार्यरत क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लि. ची उपकंपनी ‘गोदरेज ॲग्रोव्हेट लि.’ ने गोदरेज फार्ममधून थेट ग्राहकांपर्यंत ताजे दूध पुरवण्याची सेवा उपलब्ध केली.

Mumbai News : भारतात वैविध्यपूर्ण कृषी व्यवसायात कार्यरत क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लि. ची उपकंपनी ‘गोदरेज ॲग्रोव्हेट लि.’ ने गोदरेज फार्ममधून थेट ग्राहकांपर्यंत ताजे दूध पुरवण्याची सेवा उपलब्ध केली असून, त्याला ‘गोदरेज माय फार्म मिल्क प्रीमिअम असे नाव दिले आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने पाश्चराइज्ड आणि पॅकेज केलेल्या या दुधाची नैसर्गिक चव आणि पौष्टिक मूल्य अबाधित राहते. सध्या फक्त हैदराबाद येथेच ताजे दूध उपलब्ध करण्यात येणार असून, दूध काढणीपासून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित व मानवी स्पर्शरहित केली आहे.

Milk Market
Amul Milk : लोकसभा निकालाआधीच 'अमूल'ने दिला झटका; केली २ रुपयांनी वाढ

आरोग्याबाबत भारतीय ग्राहकांमध्ये जागरूकता वाढत आहे. ‘बॉटम्स अप...इंडिया सेज चिअर्स टू मिल्क’ या अहवालात ५० टक्के ग्राहक स्रोत, स्वच्छता, प्रक्रिया आणि पॅकेजिंगचा विचार करतानाच भेसळ विरहित दुधाची हमी मागत असल्याचे नमुद केले आहे.

Milk Market
Milk Rate : गाईच्या दूध दरात पुन्हा लिटरमागे दोन रुपयांची घट

त्यामुळे मुंबई येथे गुरुवारी (ता. ३० मे) झालेल्या सादरीकरण कार्यक्रमामध्ये गोदरेज जर्सीचे सीईओ भूपेंद्र सुरी म्हणाले, की गोदरेज फार्ममध्ये १,४०० गाई असून, त्यांच्या आहार, आरोग्याची वैयक्तिक काळजी घेतली जाते.

दुधाच्या काढणीपासून प्रक्रिया आणि नियंत्रित पुरवठा साखळी स्वयंचलित व अत्याधुनिक आहे. त्यात मानवी स्पर्श नसल्याने ताजे, पौष्टिक आणि आरोग्यपूर्ण दूध ग्राहकांपर्यंत पोचवले जात असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

हैदराबाद शहरामध्ये ५०० मिलि दुधासाठी ५० रुपये या दराने सध्या ७० पेक्षा अधिक आधुनिक ट्रेड स्टोअर्समध्ये आणि विविध कॉमर्स वितरण प्रणालीवर उपलब्ध करण्यात येत आहे. वर्षअखेरपर्यंत हैदराबाद शहरातील ५०० पेक्षा अधिक स्टोअर्समध्ये उत्पादने उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com