Pune News : देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर ४ जूनला लागणार आहेत. याच्याआधीच महागाईने डोके वर काढले आहे. एकीकडे भाजीपाला कडाडला असून टोल देखील महागला आहे. याचदरम्यान आता दूधाचे दर देखील वाढले आहेत. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेताना दुधाच्या प्रति लिटर दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे देशातील सामान्य माणसाला महागाईचे चटके लागणार आहेत.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, अमूल नावाने दूध विकणाऱ्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (जीसीएमएमएफ) व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी याची घोषणा केली. यावेळी मेहता म्हणाले, दूध उत्पादनाच्या प्रक्रियाचा खर्च वाढल्यामुळे किंमतीत वाढ करावी लागली आहे.
यामुळे अमूलच्या प्रति लिटर ६६ रूपये असणारी किंमत सोमवार पासून ६८ प्रति लिटर असेल. तर अमूल ब्रँडचे पराग गोल्ड दूध केवळ ६६ रुपये प्रतिलिटर दराने मिळणार आहे. त्याच्या वाढीबाबतही सध्या चर्चा सुरू आहे.
जीसीएमएमएफने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, २ रुपये प्रति लिटर वाढ म्हणजे एमआरपी ३ ते ४ टक्क्यांनी वाढली आहे. जी सरासरी अन्न महागाई दरापेक्षा खूपच कमी आहे. अमूलने फेब्रुवारी २०२३ पासून प्रमुख बाजारपेठांमध्ये ताज्या पॅकेट दुधाच्या किंमती वाढवल्या नाहीत.
आमच्या सभासद संघटनांनीही गेल्या वर्षभरात दूध उतपादक शेतकऱ्यांच्या दुधाच्या किंमतीत सुमारे ६ ते ८ टक्क्यांनी वाढ केली. एका धोरणांतर्गत, अमूल ग्राहकांकडून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी देय असलेल्या प्रत्येक रुपयातील अंदाजे ८० पैसे दूध उत्पादकांना दिले जात आहेत. दर सुधारणेमुळे आमच्या दूध उत्पादकांसाठी दुधाचे दर टिकून राहण्यास मदत होईल आणि त्यांना अधिक दूध उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळेल.
दरम्यान देशात वाढत्या उष्णतेमुळे दूध उत्पादक अडचणीत सापडला आहे. अनेक ठिकाणी चाऱ्या-पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने त्याचा थेट परिणाम हा दुधाच्या उत्पादनावर झाला आहे. अशा परिस्थितीत अमूलने लिटर दूध दरात वाढ केल्याने इतर दूध उत्पादक कंपन्याही दुधाच्या दरात वाढ करू शकतात.
नवीन दरांनुसार असे असतील बदल
*अमूल गोल्ड अर्धा लिटरची किंमत ३२ रुपयांवरून ३३ रूपये असेल
*एक लिटर अमूल गोल्ड दुधाची किंमत ६४ रुपयांवरून ६६ रुपये असेल
*अमूल ताजा अर्धा लिटरची किंमत २६ रुपयांवरून २७ रुपये असेल
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.