International Convention Center : पंजाबराव देशमुख यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर

Dr Panjabrao Deshmukh News : शिक्षण क्षेत्रात शिवाजी संस्था सुरू करून यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने २१ व्या शतकातील व्हिजन असणार आहे.
Dr Panjabrao Deshmukh
Dr Panjabrao DeshmukhAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : विदर्भातील शेतकऱ्यांसोबत कृषी क्षेत्राचा फायदा व्हावा याकरिता कृषी महाविद्यालयाच्या जागेवर शासनाकडून पंजाबराव देशमुख यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरचे भूमिपूजन २७ डिसेंबरला करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (ता. १५) केली.

शिक्षणमहर्षी कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या जयंती वर्ष निमित्ताने श्री शिवाजी शिक्षण संस्था, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन येथे आयोजित १२५ व्या व्याख्यानमालेत ते बोलत होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, मंचावर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुण चौधरी, राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या उपाध्यक्ष डॉ. कल्पना पांडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजाननराव पुंडकर, ॲड. भय्यासाहेब पुसदेकर, केशवराव मेतकर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉ. हेमंत काळमेघ, प्राचार्य डॉ. महेंद्र ढोरे, प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख उपस्थित होते.

Dr Panjabrao Deshmukh
Government Scheme : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात सातारा जिल्हा अव्वल

शिक्षण क्षेत्रात शिवाजी संस्था सुरू करून यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने २१ व्या शतकातील व्हिजन असणार आहे. शेतकऱ्यांचा, ग्रामीण भागातील लोकांच्या व विदर्भाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढील ५० वर्षांचा विचार करणे आवश्यक असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. त्यामुळे कृषी विद्यापीठासह इतर विद्यापीठेही लोकाभिमुख व्हावे असेही ते म्हणाले.

Dr Panjabrao Deshmukh
Organic Farming : डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन आता मराठवाड्यात

माजी न्यायमूर्ती अरुण चौधरी म्हणाले की, भाऊसाहेबांनी राजकारणाबरोबर समाजकारण केले. समाजकारण करताना त्यांनी वकिलीने सुरुवात केली. यामध्ये गरीब श्रीमंत असा भेदभाव केला नाही. विना पैशाने त्यांनी अनेक खटले लढले. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी विद्यापीठातील विविध कार्याची माहिती दिली. आभार कुलसचिव राजू हिवसे यांनी केले.

भाऊसाहेबांमुळे विदर्भात शैक्षणिक क्रांती ः देशमुख

भाऊसाहेब हे महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा विचार दूरदृष्टीचा होता. विविध विचारांच्या अनेक विचारवंतांना आपल्या संस्थेत आणून त्यांनी त्यांचा सन्मान केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तसेच समाजाच्या विकासाठी कार्य त्यांनी केले. भारताचा आत्मा खेड्यात आहे. हा गांधीचा विचार भाऊसाहेबांनी प्रत्यक्ष उतरविला. सावित्रीच्या लेकींना त्यांनी समर्थ केले. त्यांच्यामुळेच विदर्भात शैक्षणिक क्रांती झाली, असे हर्षवर्धन देशमुख म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com