Satara News : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत या योजनेंतर्गत (Dr. Punjabrao Deshmukh Interest Subsidy Scheme) या आर्थिक वर्षात म्हणजे २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील एकूण ३ लाख ९५ हजार ४३१ शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत ६८ कोटी ९ लाख ९९ हजार ९८५ रुपयांचा लाभ दिला असून, ही योजना राबविण्यात सातारा जिल्हा महाराष्ट्रात अव्वल स्थानी आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली.
शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थांमार्फत दिलेल्या पीक कर्जावरील व्याज दरात वसुलीशी निगडित प्रोत्साहनात्मक सूट देण्यासाठी शासनाने महत्त्वूपर्ण निर्णय घेण्यात आला होता.
शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी अल्पदराने कर्ज मिळावे व या कर्जाची परतफेड मुदतीत व्हावी यासाठी कर्जाच्या दरात सवलत देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आहे.
पीक कर्जाची उचल १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीतील हंगामामध्ये घेतलेले पीककर्ज व ते विहित मुदतीत फेडणारे शेतकरी सभासद व प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था तसेच २८ जून २०१० च्या शासन निर्णयाप्रमाणे राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण व खासगी बँका यांचे शेतकरी सभासद या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत या आर्थिक वर्षात स्टेट पूल (सर्वसाधारण) मधून ३ लाख १३ हजार १८८ शेतकऱ्यांना ५५ कोटी रुपयांचा लाभ, जिल्हा नियोजन समिती (सर्व साधारण) योजनेमधून ८१ हजार ३१० शेतकऱ्यांना १२ कोटी ९९ लाख, समाज कल्याण विभाग मधून ९३३ शेतकऱ्यांना १० लाख रुपयांचा असे एकूण ३ लाख ९५ हजार ४३१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ९८५ रुपयांचा या योजनेअंतर्गत लाभ देऊन ही योजना राबविण्यात राज्यात सातारा जिल्हा अव्वल ठरला आहे.
मुदतीत परतफेड करणाऱ्यांना सवलत
शासन निर्णय ११ जून २०२१ अन्वये सन २०२१-२०२२ वर्षापासून पीककर्ज घेतलेल्या व विहित मुदतीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत ३ लाखापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ३ टक्के व्याज सवलत दिली जात असल्याने शेतकऱ्यांना ० टक्के व्याज दराने पीककर्ज मिळत आहे. हे या योजनेचे खास वैशिष्ट्य आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.