Organic Farming : डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन आता मराठवाड्यात

PDKV Akola : राज्यातील जवळपास ३४ जिल्ह्यांत राबविले जाणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची मराठवाड्यातही अंमलबजावणी होणार आहे.
Organic Farming
Organic Farming Agrowon

Chhatrapati Sambhaji Nagar News : राज्यातील जवळपास ३४ जिल्ह्यांत राबविले जाणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची मराठवाड्यातही अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना नैसर्गिक व सेंद्रिय शेती निर्मितीचा लक्षांक देण्यात आला आहे.

राज्यातील शेतीक्षेत्रात रासायनिक खतांचा असंतुलित वापर, तसेच कीटकनाशकांचा अतिप्रमाणात आणि अनावश्यक वापर रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येत आहे. त्यानुसार सेंद्रिय शेती-रसायन अवशेषमुक्त शेतीसाठी चालना देण्यात येत आहे.

पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, मोठ्या क्षेत्रावरचे प्रमाणीकरण व कृषी विकास योजनेतून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच त्यातील शेतीमालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येईल. यामुळे -रसायन अवशेषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध होईल.

Organic Curb : जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे संवर्धन

सेंद्रिय शेतीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, पिकांचे अवशेष वापरून शेतातच सेंद्रिय शेती निविष्ठा तयार करण्याची प्रणाली विकसित करणे, तिचा इतरत्र प्रसार करणे, शेतकऱ्यांना दर्जेदार सेंद्रिय निविष्ठा योग्य पद्धतीने वापरण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करणे, सेंद्रिय शेतमालाच्या वितरणासाठी बाजारपेठ आणि स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करणे, सेंद्रिय शेतीमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे, सहभाग हमी पद्धतीने सेंद्रिय शेतीचे गट प्रमाणीकरण करून घेणे आदी या योजनेची उद्दिष्टे असतील. या योजनेत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपनीची देखील नोंदणी करण्यात येईल.

...अशी राबविली जाईल योजना

एकाच गावात किमान २० शेतकऱ्यांचा ५० हेक्टरचा एक गट या प्रमाणे गट करावा लागेल. एका मंडळात १० गटांची नोंदणी करावी लागेल. त्यासाठी एक गट प्रवर्तक, गट मार्गदर्शक व तज्ज्ञ प्रशिक्षकाची निवड केली जाईल. एका शेतकऱ्यांना कमाल २ हेक्टरपर्यंत लाभ दिला जाईल. सहभागी शेतकऱ्यांना लागवड ते काढणीपर्यंत किमान ३ प्रशिक्षणे दिली जातील.

Organic Farming
Cooperative Organization : सहकारी संस्था अधिनियम सुधारणा अध्यादेश रद्द करा

सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठा कशा तयार कराव्यात, याबाबत प्रशिक्षण दिले जाईल. शेतीचे प्रामाणीकरण करून शेतीमालाचे ब्रँडिंग केले जाईल. सहभागासाठी तालुका स्तरावरील तालुका कृषी अधिकारी व ‘आत्मा’च्या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापकाशी संपर्क साधावा.

गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांचा लक्षांक

जिल्हा...तालुके...गट...शेतकरी कंपन्या

छत्रपती संभाजीनगर...९...११०...१५

जालना...८...१००...१०

बीड...११...१४०...१४

लातूर...१०...१३०...१३

धाराशिव...८...११०...११

नांदेड...१६...२००...२०

परभणी...९...११०...११

हिंगोली...५ ...७०...७

या योजनेत लागवड ते काढणी, ब्रँडिंग व मार्केटिंगपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. त्याच्या प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून तांत्रिक मदत केली जाईल.
- जितेंद्र शिंदे, प्रकल्प संचालक आत्मा जालना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com