Inter-culture Operation : कोरडवाहू पिकांची आंतरमशागत

Rabi Season : रब्बी हंगामामध्ये अधिक उत्पादनाच्या दृष्टीने आंतरमशागतीस अनन्य साधारण महत्त्व आहे.
Inter Culture Operation
Inter Culture OperationAgrowon
Published on
Updated on

डॉ. आदिनाथ ताकटे

Rabi Crops Update : रब्बी हंगामात बहुतेक पिके उपलब्ध ओल्याव्यावरच येतात. अर्थात, थोडे फार विहिरीचे पाणी दिले जाते परंतु ते अपुरेच असते.अशा परिस्थितीत उपलब्ध ओलावा, पीक पेरणीपासून तर पीक काढणीपर्यंत कसा पुरेल आणि त्याचा जास्तीत जास्त पिकाला कसा उपयोग होईल याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी आंतरमशागतीशिवाय पर्याय नाही. रब्बी हंगामामध्ये अधिक उत्पादनाच्या दृष्टीने आंतरमशागतीस अनन्य साधारण महत्त्व आहे.

ज्वारी

पेरणीनंतर १० दिवसांनी पहिली आणि १२ ते १५ दिवसांनी दुसरी विरळणी करावी.पोंगेमर झालेली रोपे काढून टाकून आवश्यक तेथे नांगे भरावेत.जमिनीत ओल धरून ठेवण्यासाठी पिकाला तीन कोळपण्या द्याव्यात.त्यासाठी पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात पहिली,पाचव्या आठवड्यात दुसरी तर आठव्या आठवड्यात तिसरी कोळपणी करावी.त्यासाठी अखंड पासाचे कोळपे वापरावे.

Inter Culture Operation
Exportable Grape : कष्ट अन् प्रयोगशीलता हेच धन

दुसरी व तिसरी विशेषतः शेवटची कोळपणी दातेरी कोळप्याने केल्यास रान फुटून पडणाऱ्या भेगा बुजतात, बाष्पीभवन थांबते. ही कोळपणी अत्यंत महत्त्वाची आहे.तणांच्या प्रादुर्भावानुसार एक ते दोन वेळा खुरपणी करावी.जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हेक्टरी पाच टन काडी कचरा/धसकटे,सरमाड पिकाच्या दोन ओळीत पसरावा. या आच्छादनामुळे जमिनीत ओळ चांगली टिकून राहण्यास मदत होते. अनियमित हवामान, अवर्षण पडल्यास ज्वारीच्या पिकामधील प्रत्येक तिसरी ओळ काढून आंतरमशागत करावी.

Inter Culture Operation
Sugarcane Crushing : पूर्णा कारखान्याचे ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

हरभरा

पेरणीनंतर १५ दिवसांच्या आत आवश्यक तेथे नांगे भरावेत आणि विरळणी करून दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे. पेरणीपासून चार आठवड्याच्या आत एक खुरपणी आणि कोळपणी देणे आवश्यक आहे.परिणामी तणांचे नियंत्रण होऊन उत्पादनात २५ टक्के वाढ होते.

पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरवातीपासून ताणविरहित ठेवावे. पीक २० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी.कोळपणी शक्यतो वापशावर करावी.कोळपणी नंतर एक खुरपणी करावी. कोळपणीमुळे जमिनीत हवा खेळती राहते आणि पिकांची वाढ चांगली होते.कोरडवाहू क्षेत्रामध्ये कोळपणीमुळे जमिनीवर पडत असलेल्या भेगा बुजून जातात आणि ओल टिकून राहते.

डॉ.आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com