Kharif Season : मराठवाड्यात ४६ लाख ७३ हजार हेक्टरवर खरीप पिके

Sowing Update : मराठवाड्यातील सर्वसाधारण ४८ लाख ५७ हजार १५२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४६ लाख ७३ हजार २७४ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील सर्वसाधारण ४८ लाख ५७ हजार १५२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४६ लाख ७३ हजार २७४ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर कृषी विभागांतर्गत येत असलेल्या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण २० लाख ९० हजार १९८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २० लाख ३६ हजार ८१० हेक्टर म्हणजे जवळपास ९७ टक्के पेरणी आटोपली आहे. दुसरीकडे लातूर कृषी विभागांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यात सर्वसाधारण २७ लाख ६६ हजार ९५४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २६ लाख ३६ हजार ४६४ हेक्टर म्हणजे सरासरी ९५ टक्के क्षेत्रावरील पेरणी आटोपली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र सहा लाख ८४ हजार ७१६ हेक्टर आहे. त्यापैकी ६ लाख ५५ हजार ७८३ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे जवळपास ९६ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी आटोपली आहे. जिल्ह्यात मकाच्या सर्वसाधारण एक लाख ७७ हजार २८७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावर मकाची लागवड झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ११२ टक्के आहे. जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ९४ हजार ७७१ हेक्टर असताना प्रत्यक्षात तीन लाख ५५ हजार १८२ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. तुरीची ही सर्वसाधारण ३५ हजार ७०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३४,५५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Kharif Season
Kharif Season : यंदा सहा टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता

जालना जिल्हा

जिल्ह्याचे खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख १९ हजार ६९५ हेक्टर असून प्रत्यक्षात ६ लाख १५ हजार ६४३ हेक्टर म्हणजे जवळपास ९९ टक्के क्षेत्रफळ खरिपाची पेरणी आटोपली आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३८ हजार १६६ हेक्टर असून त्या तुलनेत २ लाख ९ हजार ७१ हेक्टर म्हणजे जवळपास १५१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र तीन लाख ९ ५९ हेक्टर असताना प्रत्यक्षात २ लाख ९० हजार ५८२ हेक्टर क्षेत्रावरच कपाशीची लागवड झाली आहे. जिल्ह्यात मकाचे सर्वसाधारण क्षेत्र ५३ हजार ५१ हेक्टर असताना प्रत्यक्षात ३१ हजार ३५३ हेक्टर क्षेत्रावर मकाची लागवड झाली आहे.

बीड जिल्हा

जिल्ह्याचे खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ८५ हजार ७८६ हेक्टर असताना प्रत्यक्षात ७ लाख ६५ हजार ३८४ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९४ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५५ हजार ४९३ हेक्टर असताना प्रत्यक्षात २ लाख ६४ हजार ८०५ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ७४ टक्के क्षेत्रावरच कपाशीची लागवड झाली आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख २६ हजार २३४ हेक्टर असताना प्रत्यक्षात ३ लाख ५३ हजार ६६१ क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

Kharif Season
Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात खरिपाचा पेरा अंतिम टप्प्यात

लातूर जिल्हा

जिल्ह्याचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ९९ हजार ४५६ हेक्टर असताना प्रत्यक्ष ५ लाख ९० हजार ५०१ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९८ टक्के आहे.

परभणी जिल्हा

जिल्ह्याचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ३४ हजार ९०० हेक्टर असताना प्रत्यक्षात ४ लाख ९० हजार नऊ हेक्टर म्हणजे जवळपास ८९ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली.

नांदेड जिल्हा

जिल्ह्याचे खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ६६ हजार ८०९ हेक्टर असताना प्रत्यक्षात ७ लाख १९ हजार ६१ हेक्टर म्हणजे जवळपास ९३ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे.

हिंगोली जिल्हा

जिल्ह्याचे खरिपाचे सर्व साधारण क्षेत्र ३ लाख ६१ हजार ५४ हेक्टर आहे. प्रत्यक्षात त्या तुलनेत ८९ टक्के म्हणजे जवळपास ३ लाख २३ हजार ६८८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे.

धाराशिव जिल्हा सर्वाधिक पेरा...

जिल्ह्याचे खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ४ हजार ७३५ हेक्टर असताना प्रत्यक्षात ५ लाख २४ हजार २०३ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०३ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com