Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची सामान्य कर्ज मर्यादा वाढणार

Cooperative Bank Loan : सामान्य कर्जाची मर्यादा वाढवून चार लाख रुपये केली आहे. या कर्जाचा लाभ सभासद तसेच बिगर सभासद शेतकऱ्यांनाही होणार आहे.
DCC Bank Satara
DCC Bank SataraAgrowon
Published on
Updated on

Satara News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना आणून त्यांना सवलतीच्या दरात, तर सोसायटीच्या माध्यमातून शून्य टक्क्यांनी कर्ज देऊन देशात आपला एक आदर्श निर्माण केला आहे.

सामान्य कर्जाची मर्यादा वाढवून चार लाख रुपये केली आहे. या कर्जाचा लाभ सभासद तसेच बिगर सभासद शेतकऱ्यांनाही होणार आहे. आतापर्यंत सामान्य कर्ज योजनेतून बॅंकेन ७५ हजार सभासदांना ४१० कोटींचे कर्जवाटप केले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनविण्याच्या विविध योजना राबवल्या आहेत. या योजनांतून शेतकऱ्याने समृद्धीकडे वाटचाल केली आहे. शेतकरी सभासदांसोबतच जे शेतकरी सभासद नाहीत, त्यांना बॅंकेच्या कर्ज योजनांचा लाभ मिळावा, यासाठी संचालक मंडळाने २०११ मध्ये सामान्य कर्ज योजना सुरू केली.

DCC Bank Satara
Satara District Bank : कर्जपुरवठ्यात सातारा जिल्हा बँक राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

या योजनेतून बिगर सभासद शेतकरी किंवा व्यावसायिकांना ५० हजार रुपयांचे कर्ज दिले जात होते. अनेक लहान शेतकरी, व्यावसायिकांनी या योजनेतून कर्ज घेऊन व्यवसाय वाढवला. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून बॅंकेच्या संचालक मंडळाने सामान्य कर्जाची मर्यादा ५० हजाराहून एक लाख केली. त्यानंतर एक लाखांवरून दोन लाख केली.

DCC Bank Satara
Satara DCC Bank : साताऱ्यातील विकास सोसायट्या १५० विविध व्यवसाय करणार

आता नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या योजनेची कर्ज मर्यादा चार लाख रुपये केली आहे. कर्ज घेणाऱ्यांना दोन जामीन देण्याची अट आहे. त्याचा व्याजदार दहा टक्के आहे. मोठ्या व्यावसायिक तसेच मध्यमवर्गीय शेतकरी यांना ही योजना फायद्याची ठरत आहे. या योजनेतून ७५ हजार सभासदांना ४१० कोटींचे कर्ज वाटप केलेले आहे.

परतफेडीसाठी पाच वर्षांचा कालावधी

या योजनेत कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षे असून, वार्षिक हप्ता असणार आहे. त्यामुळे मोठ्या व्यावसायिकांना ही योजना फायद्याची आहे. शेतकरी सभासदांनाही या योजनेचा लाभ घेता येत आहे. या वाढलेल्या मर्यादेमुळे अनेकांना आपले व्यवसाय समृद्ध करण्याची स्वप्ने जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून साकारता येणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com