Aslam Abdul Shanedivan
शेतकऱ्यांचे निसर्गाचा लहरीपणी, अवकाळी पाऊस, दुष्काळ यासह विविध कारणांनी आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून २०१६ मध्ये पीएम पीक विमा योजना सुरू करण्यात आली.
या योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान किंवा अनपेक्षित घटनांमुळे होणारे नुकसानीपासून संरक्षण म्हणून आर्थिक सहाय्य दिले जाते.
या योजनेला आता ८ वर्ष होत असून यातून तब्बल २३ कोटी शेतकऱ्यांना १.५५ लाख कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे.
२३ कोटी शेतकऱ्यांना हा लाभ नुकसान भरपाईच्या स्वरूपात पीक विमा घेतल्यानंतर देण्यात आला आहे.
मंत्रालयाच्या मते, ८ वर्षात या योजनेत तब्बल ५६.८० कोटी शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यापैकी २३.२२ कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे दावे प्राप्त झाले
पीक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांनी प्रीमियमचा हिस्सा म्हणून अंदाजे ३१,१३९ कोटी रूपये भरले. तर शेतकऱ्यांना १.५५.९७७ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.