Crop Cover Technology : क्रॉप कव्हरद्वारे वाढ झालेल्या ‘रेडग्लोब’ची ‘कृषी’च्या प्रधान सचिवांकडून पाहणी

Grape Variety Experiment : द्राक्षबागेतील संरक्षित शेतीचा हा प्रयोग पाहण्यासाठी स्वतः कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही. राधा यांनी बांधावर येऊन पाहणी केली.
 Grape Farming
Grape FarmingAgrowon
Published on
Updated on

Nashik News : ‘रेडग्लोब’सारख्या रंगीत द्राक्षवाणाचे प्रयोग गेल्या काही वर्षांत बोटावर मोजता येतील इतक्या शेतकऱ्यांनी यशस्वी केले आहेत. त्यामध्ये दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील महिला शेतकरी मीराबाई श्रीपत जाधव-पाटील यांनी लागवडीपश्चात क्रॉप कव्हर तंत्रज्ञानाद्वारे रेड ग्लोब वाणाची द्राक्ष बाग यशस्वीरीत्या वाढविली आहे. द्राक्षबागेतील संरक्षित शेतीचा हा प्रयोग पाहण्यासाठी स्वतः कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही. राधा यांनी बांधावर येऊन पाहणी केली. या वेळी जाधव यांच्या प्रयोगशीलतेचे त्यांनी कौतुक केले.

पारंपरिक द्राक्ष वाणांना पर्याय देत बाजारभिमुख मागणी अभ्यासून सध्या रंगीत द्राक्ष वाणांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. मात्र त्यामध्ये रेडग्लोबसारख्या द्राक्ष वाणाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये काडीमध्ये भरलेल्या ठिकाणी तडे जाऊन कलम खराब होण्याचा धोका असतो. तर मरतुकीचे प्रमाण अधिक असते. अशी आव्हाने असताना श्रीमती जाधव यांनी क्रॉप कव्हर तंत्रज्ञानाचा अवलंब केला.

 Grape Farming
Grape Farming : आगाप द्राक्ष शेतीतून समृद्ध झाले पिंगळवाडेचे शिवार

याकामी तांत्रिक मदत त्यांचा मुलगा डॉ. नानासाहेब व गणेश हे दोघे नोकरी व व्यवसाय सांभाळून गरजेनुसार करतात. त्यांनी केलेले हे काम पाहण्यासाठी नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेल्या प्रधान सचिव व्ही. राधा शिवारात पाऊस झालेला असतानाही बांधावर पोहोचल्या व त्यांनी जाधव यांच्याशी संवाद साधला. या वेळी कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, उपसचिव प्रतिभा पाटील, फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे आदी कृषी अधिकारी यांनी भेट दिली.

 Grape Farming
Grape Farming : शेवडीची दुष्काळावर मात द्राक्षात तयार केली ओळख

द्राक्ष शेतीसाठी संरक्षण शेतीचा पर्याय हा पुढे येत आहे. अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये क्रॉप कव्हर हे द्राक्ष उत्पादकांसाठी फायदेशीर ठरत आहे. या मुद्द्यावर व्ही. राधा यांनी द्राक्ष बागेसाठी क्रॉप कव्हरचा एकरी खर्च, साहित्याची गरज व उभारणी संदर्भात लागणाऱ्या सर्व तांत्रिक व व्यवहार्य बाबी जाणून घेतल्या.

यासह बागेसाठी लागणाऱ्या निविष्ठांची गरज, योग्य उपयुक्तता काळ, तापमानाचा परिणाम व सर्व अर्थकारण यांची सखोल माहिती घेतली. तसेच, या संदर्भातील अनुदान योजनांचा उपस्थित अधिकारी वर्गाकडून माहिती घेतली. नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कृषी प्रधान सचिवांनी भेट दिल्याने कामकाजासाठी ऊर्जा मिळाल्याचे मीराबाई जाधव यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com