Amravati ZP
Amravati ZPAgrowon

Amravati ZP Budget: अमरावती जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात नावीन्यपूर्ण योजना

Amravati Development Funds: अमरावती जिल्हा परिषदेच्या २९ कोटी ७२ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली असून यामध्ये महिलांसाठी ‘कमवा व शिका’ योजना, बेरोजगारांना ७०% अनुदानावर स्वयंरोजगार योजना, तसेच दुर्धर आजारग्रस्त रुग्णांसाठी आर्थिक मदतीत वाढ यांसारख्या महत्त्वाच्या योजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
Published on

Amravati News: ‘महिलांसाठी कमवा व शिका योजना’, अंशकालीन महिला स्त्री परिचरांना गणवेश, दुर्धर आजारी रुग्णांच्या सहायता निधीमध्ये वाढ, बेरोजगारांना ७० टक्के अनुदानावर स्वयंरोजगारासाठी विविध योजना यांसह इतर अनेक महत्त्वाच्या नावीन्यपूर्ण योजनांचा यंदाच्या मिनीमंत्रालयाच्या म्हणजेच जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र तसेच मुख्य वित्त व लेखाधिकारी हेमंत ठाकरे यांनी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केला. २८ कोटी ६८ लाख ९१ हजार ६२९ रुपयांचा मूळ व २०२५-२६ करिता २९ कोटी ७२ लाख ८७ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी प्रदान करण्यात आली.

Amravati ZP
Amravati ZP : ‘झेडपी’ कर्मचाऱ्यांना मिळणार एक तारखेलाच वेतन

जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींचे वाचन केले. कमवा व शिका योजनेंतर्गत यंदा तालुकानिहाय युवतींची निवड केली जाणार असून त्यांना संगणकीय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

विशेष म्हणजे हे प्रशिक्षण देत असतानाच सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत प्रशिक्षणार्थी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना कामात मदत करणार आहेत. ही एक वैशिष्ट्यपूर्ण योजना असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाल्या. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे हृदयरोग व कर्करुग्णांच्या उपचारासाठी दरवर्षी राखीव असलेली ५० लाख रुपांची तरतूद यंदा वाढविण्यात आली असून ती दीड कोटींपर्यंत करण्यात आली आहे.

Amravati ZP
Solapur ZP : सोलापूर जिल्हा परिषदेचे ४५ कोटींचे अंदाजपत्रक सादर

त्याचा लाभ अनेक रुग्णांना होणार आहे. अंशकालीन महिला स्त्री परिचरांना आतापर्यंत गणवेश देण्यात आले नव्हते, त्यांची ती मागणी अनेक दिवसांपासूनची होती, ती पूर्ण करण्यात आली असून त्यासाठी निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

२०२४-२५ या वर्षात सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या आर्थिक स्थितीचे भान ठेवून या बजेटच्या माध्यमातून जिल्ह्याचा समतोल विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
संजिता महापात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com