Shivaji University Research : शेतीला पण येणार चहापत्तीमुळे तरतरीतपणा, शिवाजी विद्यापिठाचे संशोधन

Kolhapur Shivaji University : टाकाऊ चहापूडपासून कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक शास्त्रज्ञांनी नाविन्यपूर्ण शोध लावला आहे.
Shivaji University Research
Shivaji University ResearchAgrowon
Published on
Updated on

Wasteful Tea Powder : चहा केल्यानंतर जळालेली चहापूड आपण टाकून देत असतो परंतु हीच चहापूड आता शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक शास्त्रज्ञांनी हा नाविन्यपूर्ण शोध लावला आहे. या टाकाऊ चहापत्तीपासून कार्बन डॉट्स नॅनो मटेरिअल तयार केले जाते.

हे संशोधन पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक तसेच शाश्वत शेतीस उपयुक्त ठरणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या संशोधनामुळे पिके जोमाने फोफावतात, मुळेही जोर धरतात. तसेच बियाणांची उगवण क्षमताही वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या चहापत्तीपासून तयार केलेले कार्बन डॉट्स नॅनो मटेरिअल द्रव स्वरूपात आहे. त्यामुळे याची पिकांवर फवारणी केल्यास पिकांची वाढ अधिक गतीने होण्यास मदत होते. सर्व पालेभाज्या, तसेच फळभाज्यांवरही याची फवारणी करणे सहजशक्य आहे.

या संशोधनाच्या चाचण्या प्रयोगशाळेबरोबरच प्रत्यक्ष शेतामध्येही घेण्यात आल्या आहेत. यासाठी डॉ. कोळेकर यांना विद्यापीठातील डॉ. प्रशांत अनभुले, डॉ. मानसिंगराज निंबाळकर, डॉ. अनिल गोरे, डॉ. वैभव नाईक, डॉ. दत्ता गुंजाळ यांचे सहकार्य लाभले.

शेतकऱ्यांनी चहापत्तीपासून बनविलेल्या कार्बन डॉट्स नॅनो मटेरिअल संयुगाचा वापर केल्यास रासायनिक खतांची मात्रा कमी करणे शक्य होणार आहे. खऱ्या अर्थाने हे द्रावण सेंद्रिय शेतीस पूरक ठरणार असल्याचीही माहिती कोळेकर यांनी दिली.

Shivaji University Research
Ajit Pawar Kolhapur : कोल्हापुरच्या उत्तरदायित्व सभेत शेतकऱ्यांनी मागितलं 'उत्तर', अजित पवारांच्या सभेत शेतकऱ्यांची बॅनरबाजी

शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक गोविंद कोळेकर आणि डॉ रवींद्र वाघमारे यांनी हे संशोधन केले. या संशोधनाला नुकतेच भारतीय पेटंट प्रदान करण्यात आले. हे द्रावण पूर्णतः सेंद्रिय स्वरूपाचे असून पीकवृद्धीसाठी अत्यंत परिणामकारक सिद्ध झाले आहे.

दरम्यान प्राध्यापक कोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चहापूडपासून बनवलेले कार्बन डॉट्स नॅनो मटेरिअल सोल्युशन पूर्णतः सेंद्रिय असल्याने सर्व प्रकारच्या पिकांसाठी त्याचा वापर करता येणार आहे.

यामध्ये पाणी धारण करण्याची क्षमता जास्त असल्याने जिरायती शेतीसाठी ते अधिक उपयुक्त ठरू शकते. याबाबत त्यांनी २०१७ पासून विविध मातींमध्ये संशोधनही केले आहे. यातून त्यांना चांगले रिझल्ट आल्याचीही माहिती कोळेकर सरांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com