Cotton Production : कापूस गाठी बनविण्यासाठी शेतकरी गटाचा पुढाकार

Cotton Processing : तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत (स्मार्ट) जय भवानी स्मार्ट शेतकरी उत्पादक गटाने पिकविलेल्या कापसाच्या गाठी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Farmer
FarmerAgrowon
Published on
Updated on

Akola News : तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत (स्मार्ट) जय भवानी स्मार्ट शेतकरी उत्पादक गटाने पिकविलेल्या कापसाच्या गाठी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पिकविलेला कापूस जिनिंग प्रेसिंगकडे पाठविण्यास प्रारंभ करण्यात आला.

तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत, सरपंच रविकिरण काकड, शेतकरी गटाच्या प्रमुख पल्लवी अवताडे यांच्या हस्ते ट्रॅक्टर ट्रॉलीचे पूजन करण्यात आले.

Farmer
Surgical Cotton Variety : ‘सर्जिकल’ कापूस वाण विकसित

तेल्हारा तालुक्यात एकूण १५ गावात स्मार्ट कॉटन प्रकल्प राबविण्यात येत आहे. यातून एका कापसाचे वाण पेरून उत्पादित कापसापासून त्यांच्या गाठी बनवून ‘महाकॉट’मार्फत ऑनलाइन विक्री केली जाईल.

त्यामुळे रुईवर आधारित कापूस विक्री व्यवस्थेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे व व्यापारी तत्त्वावर कापसाचे गाठींमध्ये मूल्यवर्धन करून त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळावा म्हणून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

Farmer
Cotton Market : कापसाचे वायदे वाढले; शेतकऱ्यांना कमीच भाव का? कापसाचा भाव कधीपासून वाढण्याची शक्यता आहे?

दहिगाव येथील ३० शेतकऱ्यांनी या प्रकल्पात सहभाग घेतला आहे. त्यांच्यामार्फत ५५० क्विंटल कापूस गाठी बनविण्यासाठी हिवरखेड येथील जिनिंग येथे पाठविण्यास प्रारंभ झाला. त्यापैकी शनिवारी (ता. २७) २८० क्विंटल कापूस १० ट्रॅक्टरद्वारे पाठविण्यात आला.

या वेळी शेतकऱ्यांचा गमजा, टोपी देऊन सत्कार करण्यात आला. ‘महाकॉट’चे अभय गावंडे, अकोला येथील मूल्य साखळीतज्ज्ञ श्रीकांत कराळे, ठाणेदार सचिन यादव, मंडळ कृषी अधिकारी रवींद्र माळी आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com