Cotton Production : बुलडाणा जिल्ह्यात कापूस गाठी तयार करण्यावर लक्ष

Agribusiness and Rural Transformation Project : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत (स्मार्ट) बुलडाणा जिल्ह्यात कापूस खरेदी, मूल्यवर्धनाचे काम सुरू झाले आहे. प्रकल्पातून या वर्षी किमान दोन हजार कापूस गाठी तयार करण्याचा लक्ष्यांक ठेवण्यात आला आहे.
Cotton Production
Cotton ProductionAgrowon

Buldhana News : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत (स्मार्ट) बुलडाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या क्लस्टरमध्ये काम सुरू असून या हंगामात कापूस खरेदी, मूल्यवर्धनाचे काम सुरू झाले आहे. घिर्णी (ता. मलकापूर) येथे सुमारे ४९० क्विंटल कापूस गोळा झाला तर देऊळगाव राजा तालुक्यात १०४ गाठी तयारही झाल्या आहेत. प्रकल्पातून या वर्षी किमान दोन हजार कापूस गाठी तयार करण्याचा लक्ष्यांक ठेवण्यात आला आहे.

मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतकऱ्यांनी कापूस गाठी तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचा मलकापूर येथील हरीओम जिनिंगमध्ये आत्मा प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल ऑफिसर तथा कृषी उपसंचालक दीपक पटेल यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.

Cotton Production
Cotton Production : कापसाचे उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग

या वेळी तालुका कृषी अधिकारी ललित सूर्यवंशी, प्रमोद हिवाळे, मंडळ कृषी अधिकारी गजानन पखाले, ग्रेडर गजानन निमकर्डे , कापूस मूल्य साखळी तज्ज्ञ नंदकिशोर काळे, कृषी सहायक नीता देशमुख, तलाठी सौ. मेढे, गटप्रमुख श्री. चोपडे व गटातील इतर शेतकरी सदस्य उपस्थित होते.

श्री. सूर्यवंशी यांनी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस मूल्यवर्धन साखळीबाबत माहिती दिली. त्यानंतर श्री. उन्हाळे यांनी कापूस मूल्यवर्धनाचे महत्त्व आणि यातून शेतकऱ्यांना होणारा फायदा या गोष्टी पटवून सांगितल्या. या शेतकरी गटाचा आतापर्यंत ४९० क्विंटल कापूस गोळा झाला. यामध्ये ३० जणांचा शेतकरी गटात सहभाग असून त्यापैकी आठ ते नऊ जणांनी हा कापूस दिलेला आहे. सध्या खुल्या बाजारात ६७०० ते ६८०० रुपये दर मिळतो आहे. त्यामुळे प्रक्रियेनंतर थोडाफार फायदा होईल.

Cotton Production
Cotton Production : भारत जगातील सर्वाधिक कापूस उत्पादक देश व्हावा

देऊळगाव राजामध्ये १०४ गाठी तयार

प्रकल्पात देऊळगावराजा तालुक्यात काम पुढे गेले असून सरंबा येथील जय हनुमान कापूस उत्पादक गटाच्या पुढाकाराने देऊळगावमही येथे ४९४ क्विंटल कापूस खरेदी झाला. यामधून १०४ कापूस गाठी तयारही झाल्या आहेत. या गाठींचे ई-ऑक्शन होणार आहे.

देऊळगावराजा, खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद हे चार तालुके सहभागी असून ५६ गावांत प्रकल्प राबवत आहोत. गेल्या वर्षात देऊळगावमध्ये १०७ गाठी केल्या होत्या. २ हजारांवर गाठी तयार करण्याचे उद्दिष्ट घेतले आहे. त्याचे काम सुरू आहे.
बिपीन राठोड, पुरवठा साखळी-मूल्य साखळी तज्ज्ञ, स्मार्ट प्रकल्प, बुलडाणा
आमचा ३० शेतकऱ्यांचा गट असून पहिल्या ४९० क्विंटल कापूस गोळा झाला. आणखी ५०० क्विंटलपर्यंत कापूस गोळा करणार आहोत. पहिल्याच वर्षात आमचा गट किमान हजार क्विंटल कापसावर प्रक्रिया करून गाठी तयार करणार आहे.
विष्णुदास भगवान चोपडे, घिर्णी स्मार्ट कॉटन शेतकरी गट, घिर्णी, जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com