Rajendra Pawar : शेतकरी केंद्रस्थानी ठेवून पायाभूत सुविधा पुरवाव्यात

Latest Agriculture News : बाजार समिती प्रशासनाने शेतकरी केंद्रस्थानी ठेवून त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढे आले पाहिजे.
Rajendra Pawar
Rajendra PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News : बाजार समिती प्रशासनाने शेतकरी केंद्रस्थानी ठेवून त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढे आले पाहिजे. राज्यात नव्याने कार्यरत झालेल्या बाजार समिती सदस्यांना, अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाजार समितीचे कामकाज करणे सुकर व्हावे, यासाठी कृषी पणन मंडळाने शासकीय निर्णय व अधिसूचना या बाबतची निर्माण केलेली पुस्तिका कामकाजात दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी केले.

राज्यात २९० कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या. त्या बाजार समित्यांमध्ये नवीन सभापती, उपसभापती, सदस्य, सचिव कार्यरत झाले आहेत. संबंधित पदाधिकाऱ्यांना पणन कायदा, सुधारणा आणि त्यामधील शेतकऱ्यांच्या फायद्याच्या तरतुदी समजाव्यात, यासाठी बारामती-शारदानगर येथे नवनिर्वाचित बाजार समिती पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली. त्यावेळी पवार बोलत होते.

Rajendra Pawar
Agriculture Education : कोकणभूमीतील शैक्षणिक नंदनवन

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ-पुणे व राष्ट्रीय सुगीपश्‍चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे-पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती कृषी महाविद्यालय - शारदानगर येथे बाजार समितीचे पदाधिकाऱ्यांची पणनविषयक कार्यशाळा झाली. बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले.

Rajendra Pawar
Agriculture Irrigation : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी आवर्तनाला सुरुवात

वरिष्ठ विपणन अधिकारी ऋग्वेद सुरवसे, विशेष लेखा परीक्षक विजय पाखले, पणन मंडळ पुण्याचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, राजेंद्र महाजन, उपनिबंधक (कराड-सहकारी संस्था) संदीप जाधव, बारामतीचे सहायक निबंधक (सहकारी संस्था) मिलिंद टंकसाळे, बारामतीचे सभापती सुनील पवार, सचिव अरविंद जगताप, अनंत सावरकर, कैलास फटांगरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये पुणे, सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

बाजार समितीच्या रँकिंगमध्ये राज्यात प्रथम क्रमांक आलेल्या बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार व सदस्य मंडळाचा सन्मान राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला. अधिकारी राजेंद्र महाजन यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com