Agriculture Infrastructure : कृषी पायाभूत सुविधांसाठी आत्मनिर्भर अभियान

Atmnirbhar Abhiyan : कृषी पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी आत्मनिर्भर भारत अभियानात महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Amravati News : कृषी पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी आत्मनिर्भर भारत अभियानात महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) अर्चना निस्ताने यांनी केले आहे.

शेतकरी आणि त्यांच्या संस्थांना काढणीपश्‍चात सुविधा उभारण्यासाठी मदत करून बाजार संपर्क वाढविणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे ही योजनेची उद्दिष्ट्ये आहेत.

पतपुरवठ्यातील बँकांची जोखीम कमी करण्यासाठी पतहमी व व्याज सवलत योजनेतून दिली जाणार आहे. शेतकरी, बँका व ग्राहक यांच्यात परस्परहिताचे वातावरण तयार होईल. त्याचप्रमाणे, नवनवे कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहतील.

Indian Agriculture
Agriculture CET Exam : कृषी पदव्युत्तर ‘सीईटी’साठी १७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

प्राथमिक कृषी पतसंस्था, विपणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसाह्यता गट, शेतकरी, संयुक्त उत्तरदायित्व गट, बहुउद्देशीय सहकारी संस्था, कृषी उद्योजक, केंद्रीय, राज्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रस्तावित केलेले सार्वजनिक, खासगी भागीदारी प्रकल्प, कृषी उत्पन्न बाजार समिती, वखार महामंडळ, कृषी स्टार्टअप आदी यासाठी पात्र लाभार्थी आहेत. या योजनेत दोन कोटीपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत अधिकतम ७ वर्षांपर्यंत दिली जाणार आहे. लघुउद्योगांसाठी पतहमी निधी संस्थेकडून दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाला पतहमी देण्यात येणार आहे.

‘हे उद्योग उभारता येतील’

काढणीपश्‍चात व्यवस्थापन प्रकल्पांत पुरवठा साखळी विकासाचे प्रकल्प आणि ई-मार्केट प्लॅटफॉर्म, गोदाम उभारणी, सायलो, पॅकहाउस, गुणवत्ता निर्धार सुविधा, प्रतवारी सुविधा, शीतसाखळी, वाहतूक व्यवस्थापन सुविधा, प्राथमिक प्रक्रिया सुविधा, फळे पिकवणे सुविधा आदींची निर्मिती करता येईल.

Indian Agriculture
Agriculture Minister : अब्दुल सत्तारांचा अखेर 'करेक्ट कार्यक्रम', कृषी खातं घेतलं काढून

त्याचप्रमाणे, सामूहिक शेती सुविधांत सेंद्रिय निविष्ठा उत्पादन केंद्र, जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र, काटेकोर शेतीसाठी सुविधा, पुरवठा साखळी सुविधा, पीपीपी तत्त्वावरील शासनाच्या सामूहिक शेती योजनांसाठीच्या सुविधा समाविष्ट आहेत.

शेती, पीक काढणीमध्ये स्वयंचलन, ड्रोनखरेदी, शेतामध्ये संवेदनशील कुंपण, फार्म ॲडव्हायझरी सर्व्हिसेस हायड्रोफोनिक, व्हर्टिकल फार्मिंग, एरोफोनिक फार्मिंग, पॉलिहाउस, ग्रीनहाउस, अळिंबी लागवड यांचाही नव्याने समावेश करण्यात आला आहे.

प्राथमिक प्रक्रिया प्रकल्पाखेरीज डाळ मिल, तृणधान्याचे पीठ तयार करणे, तेलघाणी, काजू प्रक्रिया, उसापासून गूळ किंवा गूळ पावडर तयार करणे, कापूस जिनिंग, प्रेसिंग आदींना अपवादात्मक पात्र प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com