Infertility in Livestock : राज्यातील ३० टक्के पशुधनात वंध्यत्व

Livestock Update : राज्यातील एकूण प्रजननक्षम पशुधनाच्या ३० टक्क्यांहून अधिक पशुधन प्रजननासाठी सक्षम नसल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या वंध्यत्व निवारण शिबिरांमधून समोर आले आहे.
Livestock
LivestockAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील एकूण प्रजननक्षम पशुधनाच्या ३० टक्क्यांहून अधिक पशुधन प्रजननासाठी सक्षम नसल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या वंध्यत्व निवारण शिबिरांमधून समोर आले आहे. नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये राबविण्यात आलेल्या ३९ हजार २९ वंध्यत्व निवारण शिबिरांमध्ये ही बाब लक्षात आली आहे.

पशुसंवर्धन विभागाने तब्बल ३९ हजार २९ वंध्यत्व निवारण शिबिरे घेतली. त्यात ५ लाख ३१ हजार ४३३ गाई व म्हशींची तपासणी करण्यात आली. यापैकी चार लाख १८ हजार ९९३ गाई व म्हशींवर उपचार करण्यात आले. निदान झालेल्या १३२३ गाई व म्हशींचे वंदत्व निवारण करण्यात आले तर ३८४ गायी व म्हशींवर कृत्रिम रेतन करण्यात आले.

Livestock
Livestock Market : आळेफाटा येथील गाईंच्या बाजारात ४५ लाखांची उलाढाल

महाराष्ट्राचा देशपातळीवर दुग्ध उत्पादनात सहावा क्रमांक लागतो. २०१९ च्या २० व्या पशुगणननेनुसार राज्यात १ कोटी ९५ लाख ९५ हजार ९९५ गाई म्हशी असून त्यापैकी ५५ लाख २२ हजार ५२७ गायी आणि ३२ लाख ८१ हजार ६५७ म्हशी पैदास सक्षम आहेत. सद्यःस्थितीत राज्यातील पैदास क्षम गाई, म्हशींच्या संख्येच्या तुलनेत केवळ १८ टक्के गाई आणि म्हशींमध्ये कृत्रिम रेतन केले जाते.

राज्यात वंधत्व असलेल्या व माजावर न येणाऱ्या गाई, म्हशींची संख्या जवळपास ४० लाख आहे. त्यामुळे याचा दुग्ध उत्पादनावर मोठा परिणाम होतो. देशातील दुग्ध उत्पादनात अग्रेसर असलेल्या इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील दुधाळ गाई, म्हशींची उत्पादन क्षमता कमी आहे. तसेच भाकड जनावरांची संख्या सुद्धा मोठी आहे.

दुधाळ जनावरे भाकड राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्यातील वंध्यत्व. सर्वसाधारणपणे ४० ते ६० टक्के दुधाळ जनावरांमध्ये वंध्यत्व किंवा माजावर न येणे यासारखी समस्या दिसून येते. शारीरिक वजन वाढ आणि पशू प्रजननाचा थेट संबंध असून अपेक्षित शारीरिक वाढ असणाऱ्या पशुधनामध्ये उच्च प्रजनन क्षमता दिसून येते. काळवडीत २५० किलोग्रॅम तर पाड्यांमध्ये २७५ किलोग्रॅम शारीरिक वजन गाठल्यानंतर पहिला माज येतो. असे असले तरी बहुतांश जनावरांमध्ये शारीरिक वाढ खुंटल्याचे शिबिरामध्ये लक्षात आले.

Livestock
Livestock Registration : जनावरांच्या टॅगिंग कामाला वेग

पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने ही शिबिरे घेण्यात आली. तपासणी दरम्यान जनावरांमध्ये पांढरट स्त्राव वाढलेले केस, खुरटी उंची, डोळे आत मध्ये जाणे अशा बाह्य लक्षणाद्वारेही तपासणी करण्यात आली. पशुपालकांना जनावरांची उंची वाढविण्याबरोबरच खाद्य, माजावर लक्ष ठेवणे आणि अन्य सूचना देण्यात आल्या. बहुतांश जनावरांमध्ये समतोल आहाराचा अभाव ही बाब वंध्यत्वाला कारणीभूत असल्याचे समोर आल्याचे अवर सचिव संजय डोईजोडे यांनी सांगितले.

वंध्यत्वाची प्रमुख कारणे...

बहुतांश जनावरांमध्ये समतोल आहाराचा अभाव. ही बाब प्रामुख्याने वंध्यत्वाला कारणीभूत

जननेंद्रियांची वाढ नाही

खनिज जीवनसत्त्वांचा अभाव

गर्भाशयाचा दाव

वंध्यत्व निवारण शिबिर स्थिती

शिबिरांची संख्या...३८ हजार २९

तपासणी केलेल्या गाई व म्हशी...५३१४३३

उपचार केलेल्या गाई व म्हशी...४१८९९३

वंध्यत्व निवारण झालेल्या गायी व म्हशी...१३२३

कृत्रीम रेतन केलेल्या गायी व म्हशी...३८४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com