Livestock Registration : जनावरांच्या टॅगिंग कामाला वेग

Dr. Pradip Ranvare : मोहोळ तालुक्यातील सुमारे तीस हजार जनावरांचे टॅगिंग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, यामुळे माणसाप्रमाणे जनावरांचाही डाटा तयार होणार आहे, अशी माहिती पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप रणवरे यांनी दिली.
Livestock Tagging
Livestock TaggingAgrowon

Solapur News : शासनाने जाहीर केल्यानुसार दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे, त्यासाठी मोहोळ तालुक्यातील सुमारे तीस हजार जनावरांचे टॅगिंग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, यामुळे माणसाप्रमाणे जनावरांचाही डाटा तयार होणार आहे, अशी माहिती पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप रणवरे यांनी दिली.

दुधाचे दर कमी झाल्याने अनुदानाची मागणी होत होती, त्यानुसार हे अनुदान जाहीर झाले आहे. पण त्यासाठी जनावरांचे टॅगिंग महत्त्वाचे आहे. त्यासाठी ही मोहीम सुरू आहे. मोहोळ तालुक्यात एकूण गाईंची संख्या ९० हजार एवढी आहे.

Livestock Tagging
Milk Subsidy : टॅगिंग नसल्यास दूध अनुदान नाही

नव्याने खरेदी झालेली व व्यालेली जनावरांची संख्या ही मोठी आहे. दूध व्यवसाय हा तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे. अनुदान देय जनावरांची संख्या निश्चित करण्यासाठी दूध संकलन केंद्र चालकांना शेतकऱ्यांनी आणलेल्या दुधाचे फॅट शासनाला कळविणे बंधनकारक केले आहे.

तसेच कानाला टँगिंग मारताना जनावरांचा फोटो, मालकाचा मोबाइल नंबर या सर्व गोष्टी ‘भारत पशुधन’ या ॲपवर अपलोड करावयाच्या आहेत. त्यासाठी काही मानधनावर खासगी ५४ जणांची नियुक्ती केली आहे. माणसांचे ज्याप्रमाणे कुठल्याही व्यवहारासाठी टॅगिंग अनिवार्य असल्याचे डॉ. रणवरे यांनी सांगितले.

Livestock Tagging
Livestock Registration : पशुधनाचे युनिक टॅगिंग करून ऑनलाइन नोंदणी करा

जनावरांना टॅगिंग आवश्यकच

नैसर्गिक आपत्तीत मृत्यू पावलेल्या जनावरांना मदत देण्यासाठी, तसेच विविध रोगांवर औषधोपचार करण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक असून, ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही जनावरांना टॅगिंग मारून घेतले नाहीत, त्यांनी ते मारून घ्यावेत. ज्या जनावरांच्या कानाला बिल्ले आहेत, तीच जनावरे अधिकृत धरली जाणार आहेत, असेही डॉ. रणवरे यांनी सांगितले.

फेब्रुवारीत जनावरांची पशुगणना होणार आहे. ज्या जनावरांना टॅगिंग आहेत, तीच जनावरे गणली जाणार आहेत. जनावरांच्या कानाला टॅगिंग नसल्यास त्यांची बाजारात खरेदी-विक्री ही होणार नाही.
डॉ प्रदीप रणवरे, पशुधन विकास अधिकारी, मोहोळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com