Talathi Suspended : इंदवेचे तलाठी निलंबित; रंजानेच्या मंडळाधिकाऱ्यांना नोटीस

Revenue Collection : महसूल वसुलीची टक्केवारी कमी असल्याने व अवैध गौणखनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी एकही कारवाई न केल्याचा ठपका ठेवत इंदवे (ता. साक्री) येथील तलाठ्याला निलंबित करण्यात आले.
Talathi Suspend
Talathi SuspendAgrowon

Dhule News : महसूल वसुलीची टक्केवारी कमी असल्याने व अवैध गौणखनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी एकही कारवाई न केल्याचा ठपका ठेवत इंदवे (ता. साक्री) येथील तलाठ्याला निलंबित करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागीय चौकशीचेही आदेश दिले. तर रंजाने (ता. शिंदखेडा) येथील मंडळाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. श्री. वाजे व भामरे यांच्यावर शासकीय कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Talathi Suspend
Kunbi Record : ‘कुणबी’ नोंदीच्या शोधासाठी पंधरवड्याची मुदत

साक्री तहसील कार्यालयात कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली ४ जानेवारीला आढावा बैठक झाली. त्या वेळी तलाठी तानाजी वाजे यांनी इंदवे, हट्टी खुर्द, ऐचाळे, बळसाणे या चार सज्जांची ई-चावडीवर मागणी निश्चित केली नसल्याचे आढळले.

शिवाय, त्यांनी केलेली महसुली वसुलीची टक्केवारी तालुका सरासरीपेक्षा कमी आढळली. त्यांनी गौणखनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी एकही कारवाई केली नाही. त्यांच्यावर सोपविण्यात आलेली महत्त्वाची कामे विहित मुदतीत केली नाहीत. यामुळे शासकीय कर्तव्यात कसूर केल्याने, वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून तलाठी वाजे यांना शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरवून निलंबित करण्यात आले.

Talathi Suspend
Ishanya Foundation : ईशान्‍य फाउंडेशनकडून घरपोच आरोग्यसेवेसाठी मोबाइल क्लिनिक

शासकीय कामात हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याने, वर्तन, सचोटी व कर्तव्यपरायणता ठेवली नाही, शासकीय शिस्तीचा भंग केला, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमातील तरतुदींचा भंग केला, असा ठपका ठेवत तलाठी श्री. वाजे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले. तसेच त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित केली. निलंबन कालावधीत तलाठी वाजे यांना कळगाव (रंजाळे, ता. शिंदखेडा) येथे मुख्यालय दिले.

मंडळाधिकाऱ्यांना नोटीस

रंजाने (ता. शिंदखेडा) येथील मंडळाधिकारी अशोक भामरे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शिंदखेडा तहसील कार्यालयात ५ जानेवारीला जिल्हाधिकारी गोयल यांनी आढावा बैठक घेतली. त्या वेळी मंडळाधिकारी भामरे यांनी २०२३-२४ या वर्षाची लेखाशीर्ष ००२९ जमीन महसूल मागणी ऑगस्ट-२०२३ मध्ये पूर्ण करणे अपेक्षित असताना ई-चावडीप्रणालीमध्ये अचूकपणे मागणी निश्चित केली नाही.

वसुलीची टक्केवारी असमाधानकारक आहे. तलाठ्यांशी कोणत्याही प्रकारे समन्वय साधला नसल्याचे आढळले. शासकीय वसुली कामात हलगर्जी केली. शासकीय कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियम (शिस्त व अपील) १९७९ नुसार कारवाई का करण्यात येऊ नये, याविषयी लेखी खुलासा समक्ष करावा, अशी नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी भामरे यांना बजावली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com