Indian Seed Congress : पुण्यात आजपासून ‘इंडियन सीड कॉंग्रेस’ दर्जेदार बियाणे उत्पादनासंबंधी होणार मंथन

NASI Conference : गुणवत्तापूर्ण बियाण्यांच्या पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एनएएसआय) या परिषदेचे आयोजन केले आहे.
National Seed Association of India
National Seed Association of IndiaAgrowon
Published on
Updated on

Pune News : शाश्वत शेतीसाठी दर्जेदार बियाण्यांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्दिष्टासाठी पुण्यात आजपासून (ता.२९) दोन दिवसीय ‘इंडियन सीड काँग्रेस २०२४’ होत आहे.
गुणवत्तापूर्ण बियाण्यांच्या पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एनएएसआय) या परिषदेचे आयोजन केले आहे.

त्यासाठी ‘एनएएसआय’चे अध्यक्ष प्रभाकर राव, उपाध्यक्ष दिनेशभाई पटेल, कोषाध्यक्ष वैभव काशिकर, निमंत्रक अजित मुळे व इतर पदाधिकारी नियोजन करीत आहेत.कोरेगाव पार्क अॅनेक्स येथील वेस्टिन हॉटेलमध्ये आज सकाळी १० वाजेपासून परिषदेला सुरवात होईल.
यात केंद्र व राज्य शासनाचे उच्चपदस्थ अधिकारी, नामवंत कंपन्यांचे प्रतिनिधी, शास्त्रज्ञ, तज्ज्ञ व बियाणे उद्योगाशी संबंधित मान्यवर सहभागी होत आहेत.

National Seed Association of India
Crop Damage : कोंडिवरेतील वणव्यात केळी, ऊस पीक भस्मसात

बियाणे उद्योगातील ज्ञान-तंत्रज्ञानाची देवाणघेवाण व सहयोग सुलभ व्हावा, यासाठी कोणती प्रणाली व व्यासपीठ असावे, बियाणे तंत्रज्ञानातील प्रगती अधिक सुकर कशी होईल, बियाणे नियामक आराखडा कसा असावा, बाजारातील कल कोणत्या दिशेला जात आहेत तसेच शाश्वत शेतीसाठी संशोधनाच्या कोणत्या अंगाला प्राधान्य द्यावे याविषयी आम्ही परिषदेत चर्चा करणार आहोत, असे निमंत्रक अजित मुळे (Ajit Mule) यांनी सांगितले.

“इंडियन सीड काँग्रेसचा हेतू देशातील शेतकऱ्यांचे पीक उत्पादन आणि उत्पादकता वाढ हाच आहे. त्यासाठी अपेक्षित सुधारणा, कृषी क्षेत्रातील स्टार्टअप, बियाणे उद्योगातील नवे तंत्रज्ञान आणि उत्पादने याच्या प्रचार-प्रसाराला प्राधान्य दिले जाईल,” असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष सी. डी. मायी, भारतीय गवताळ भूमी व चारा संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेत आज सकाळच्या सत्रात चर्चा होईल. तसेच कानपूरच्या चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठाचे (Chandra Shekhar Azad University of Agriculture) कुलगुरू डॉ. ए. के. सिंग, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, परभणी (Parbhani) येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इंद्र मणी व ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्री यांच्या मार्गदर्शनाखालीदेखील चर्चासत्रे होतील.

National Seed Association of India
Electricity Bill : २४ तास कृषी पंपाला वीज पुरवठा करण्यावरून पटोलेंची फडणविसांना कोपरखळी!

परिषदेत उद्या (ता.१) केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश रंजन, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अतिरिक्त महासंचालक (बियाणे) डॉ. डी. के. यादव सहभागी होतील. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सहसचिव पंकज यादव, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, वनस्पती वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. त्रिलोचन महापात्रा व ‘एनएएसआय’चे अध्यक्ष प्रभाकर राव मार्गदर्शन करतील. त्यांच्या भूमिकेकडे बियाणे उद्योगाचे (Seed Processing) लक्ष लागून आहे.

देशातील बियाणे उद्योगाची राष्ट्रीय परिषद महाराष्ट्रात होत असल्याबद्दल खूप आनंद होतो आहे. भारतीय बियाणे उद्योगात राज्याचे योगदान उल्लेखनीय आहे. परिषद यशस्वी होण्यासाठी ‘सियाम’ प्रयत्नशील आहे.
समीर मुळे, अध्यक्ष, सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सियाम)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com