Operation Sindoor : भारतीय लष्कराकडून पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त: परराष्ट्र मंत्रालय

India avenges Pahalgam Attack: या हवाई हल्ल्यात केवळ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आली असून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लष्कराने हे पाऊल उचलल्याचं संरक्षण मंत्रालयान स्पष्ट केलं आहे.
Operation Sindoor
Operation SindoorAgrowon
Published on
Updated on

India strikes Pakistan over tourist killings : भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर बुधवारी (ता.७) मध्यरात्री 'ऑपरेशन सिंदूर' आखून हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात पाकिस्तानमधील एकूण नऊ दहशतवादी ठिकाण उद्ध्वस्त केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. यामध्ये केवळ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आलं असून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लष्कराने हे पाऊल उचलल्याचं परराष्ट्र मंत्रालयान स्पष्ट केलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत माहितीनुसार, "काही वेळापूर्वीच भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत. भारतावर हल्ला करण्याचा कट जिथे आखण्यात आला होता, तिथे हे हल्ले करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यात आली "

तसेच आमची कृती केंद्रित, मोजूनमापून केलेली आणि तणाव वाढू न देणारी आहे. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले नाही. भारताने या तळांची निवड करताना आणि त्यावर कारवाई करताना अतिशय संयम दाखवला आहे, असंही परराष्ट्र मंत्रालय म्हणाले.

काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ल्या केला. त्यामध्ये २६ निरपराध नागरिकांना प्राण गमवावे लागले. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी घेतली होती. हल्ला करणाऱ्यांना क्रूरपणे उत्तर देण्यात येईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला होता.

Operation Sindoor
India-Pakistan Water Conflict: नद्यांचे पाणी रोखल्यास पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर देऊ

भारतीय लष्कराने या हल्ल्याची माहिती बुधवारी (ता.७) पत्रकार परिषदेमध्ये दिली. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रमी मिसरी यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, रेझिस्टन्स फ्रंट नावाच्या गटाने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हा गट पाकिस्तानच्या दहशतवादी संघटने लष्कर-ए-तैयबाचा एक मोर्चा आहे. या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा संबंध सिद्ध झाल्याचं मिसरी यांनी सांगितलं.

तसेच कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, "मरकज सुभानल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे आम्ही त्यावर हल्ला केला. परिणामी इतर कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही आणि नागरिकांची जीवितहानी झाली नाही."

नऊ ठिकाण कोणती?

१.मरकज सुभान अल्लाह, बहावलपूर

२.मरकज तैयबा, मुरीदके

३. सरजाल / तेहरा कलां

४. महमूना जोया सुविधा, सियालकोट

५. मरकज अहले हदीस, बरनाला, भिंबर

६. मरकज अब्बास, कोटली

७. मस्कर राहील शाहिद, कोटली जिल्ह्यात स्थित

८. शावई नाला छावणी, मुजफ्फराबाद

९. मरकज सय्यदना बिलाल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com