Wheat Export : देशात गव्हाचा पुरेसा साठा; मग निर्यातीला मोकळीक कधी?

Wheat Export Ban : २०१७ नंतर पहिल्यांदाच गहू आयातीची अटकळ बांधली गेली. परंतु यंदा मात्र गहू उत्पादनाचं चित्र सुधारलं आहे. त्यामुळे संरक्षित साठ्यात वाढ झाली. त्यामुळे आयातीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
PM Modi
PM ModiAgrowon
Published on
Updated on

Wheat Production India : यंदा देशांतर्गत गव्हाचं उत्पादन चांगलं झालं आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा गहू साठा उपलब्ध असून आयातीची गरज भासणार नसल्याचं सरकारी सुत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार गव्हावरील निर्यातबंदी खुली करण्याचा निर्णय घेणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. केंद्र सरकारने २०२२ पासून गहू निर्यातीवर बंदी लादली आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून जागतिक बाजारात गव्हाच्या दरात तेजी असूनही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला.

२०२२ मध्ये उष्णतेच्या लाटांमुळे गहू उत्पादनात घट आली. पुढे २०२३ आणि २०२४ मध्ये उष्णतेच्या झळा तीव्र झाल्याने उत्पादना परिणाम झाला. त्यामुळे सरकारी खरेदीला ब्रेक लागला. सरकारकडील संरक्षित साठा (बफर स्टॉक) कमी झाला. परिणामी २०१७ नंतर पहिल्यांदाच गहू आयातीची अटकळ बांधली गेली. परंतु यंदा मात्र गहू उत्पादनाचं चित्र सुधारलं आहे. त्यामुळे संरक्षित साठ्यात वाढ झाली. त्यामुळे आयातीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

आता गहू पुरवठा व दराबाबतची परिस्थिती केंद्र सरकारच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे सध्या केंद्र सरकार गहू आयात शुल्क ४०% कमी करण्याचा किंवा राजनैतिक मार्गाने आयात करण्याचा कोणताही विचार करत नसल्याची माहिती समोर आली आहे. मग केंद्र सरकार गव्हावरील बंदी उठणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

PM Modi
Wheat Production: उष्णतेच्या लाटांचा गहू उत्पादनावर परिणाम नाही; केंद्रीय कृषिमंत्र्यांचा दावा

चालू विपणन वर्षात आत्तापर्यंत भारतीय अन्न महामंडळाने अर्थात एफसीआयने २९.७ दशलक्ष टन गहू खरेदी केली आहे. एफसीआयला मागील तीन वर्षात गहू खरेदीचं उद्दिष्ट गाठता आलं नाही. परंतु यंदा मात्र एफसीआयने मागील चार वर्षातील सर्वाधिक खरेदी केली आहे. त्यामुळे यंदाची एकूण सरकारी खरेदी ३२ ते ३२.५ दशलक्ष टनांपर्यंतपोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे गहू खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास अलीकडेच अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केला आहे.  

देशातील गहू उत्पादनात वाढ होण्याचा दावा कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. मागील वर्षी मॉन्सून हंगामात चांगला पाऊस बरसला त्यामुळे गहू पिकाला फायदा झाला. तसेच निर्यात बंदी उठेल आणि जागतिक बाजारातील तेजी फायदा मिळेल, या आशाने प्रमुख गहू उत्पादक राज्यात शेतकऱ्यांनी गव्हाला पसंती दिली. एफसीआयच्या खरेदीकडे कल दाखवला. त्यामुळे साठा पुरेसा झाला आहे. परिणामी आता शेतकऱ्यांना गव्हावरील निर्यात बंदी हटवण्याची अपेक्षा आहे. 

जागतिक बाजारात दरावर दबाव?

भारताने गव्हावर निर्यात बंदी घातल्यामुळे जागतिक बाजारात गव्हाच्या दरात वाढ झाली होती. मागील पाच महिन्यात मात्र गव्हाचे दर निचांकी पातळीवर गेले आहेत. पुढील काळात भारत गहू आयात करणार नाही, याचे स्पष्ट संकेत मिळाल्यानंतर जागतिक बाजारात गव्हाच्या दरावर दबाव निर्माण होण्याची शक्यता अभ्यासकांकडून वर्तवली जात आहे. विशेषतः अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यासारख्या प्रमुख निर्यातदार देशांमध्ये उत्पादन चांगले झालं आहे. तर चीनकडून मागणी घटल्याचं जाणकार सांगतात. 

PM Modi
Wheat PDS Distribution : केंद्र सरकार रेशनिंगमधील गहू वाटप पूर्वपदावर आणणार?

दरम्यान, सरकारने यावर्षी गहू उत्पादन ११५.४ दशलक्ष टन होईल असा अंदाज वर्तवला आहे. परंतु काही भागात अवकाळी पाऊस आणि कीडरोगांसह उष्णतेचा काहीसा फटका पिकाला बसल्याचं शेतकरी सांगतात. तरीही उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे ४ दशलक्ष टनांनी जास्त आहे, असा दावा उद्योगाकडून केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com