Index of Agricultural Positioning : शेतीच्या स्थितिस्थापकतेचा निर्देशांक

Article by Dr. Chandrashekhar Pawar and Dr. Satish Patil : तीव्र आपत्तीच्या काळानंतर शेतीची स्थिती पूर्वपदावर किती काळात येते, हेही पाहणे अत्यावश्यक ठरते. याला शास्त्रीय भाषेमध्ये ‘स्थितिस्थापकता’ असे म्हणतात. दुष्काळ /अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेती दुष्काळी वर्षात आणि सरासरी वर्षात किती उत्पादन देते, याची तुलना करून शेतीच्या स्थितिस्थापकतेचा निर्देशांक काढला जातो.
Index of Agricultural Positioning
Index of Agricultural PositioningAgrowon

डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील

Agricultural Yearly Production Index : नैसर्गिक संपन्नता असणाऱ्या आपल्या भारतात नैसर्गिक अरिष्टेही कमी नाहीत. १२ व्या शतकामध्ये सर्वांत मोठा एक तपाहून अधिक वर्षे दुष्काळ पडला होता. त्याला ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ या नावाने ओळखले जाते. त्यानंतर ‘नेमेचि येतो दुष्काळ’ या उक्तीप्रमाणे दर पाच वर्षांनी आपल्या राज्यावर दुष्काळाचे सावट राहिले आहे.

पण सात, आठ दशकांपूर्वीची शेती आणि आजची शेती यात मोठा फरक पडला आहे. पूर्वी प्रामुख्याने बैलांच्या साह्याने शेणखतावर आधारित शेती केली जाई. पण आता आपण रासायनिक घटकांवर आधारित नैसर्गिक साधनसंपत्तीचा व्यय वाढविणारी शेती करत आहोत. नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये माती, जमिनीसोबतच जलसंपदा सर्वांत महत्त्वाची ठरते. त्यातही शेती अधिक उत्पादक करायची असल्यास जलसंपदा पहिल्या क्रमांकावर येते.

शेती आणि पर्यावरणामध्ये वाढलेल्या माणसांच्या अतिहस्तक्षेपामुळे ऱ्हास वाढला आहे. (उदा. शेतीसाठी वापरले जाणारे भूपृष्ठावरील किंवा भूगर्भातील जलसाठे इ.) हवामान बदलाचे संकटामध्ये पावसाचे प्रमाण व वितरण अनियमित झाल्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

अशा तीव्र आपत्तीच्या काळानंतर शेतीची स्थिती पूर्वपदावर किती काळात येते, हेही पाहणे अत्यावश्यक ठरते. याला शास्त्रीय भाषेमध्ये ‘स्थितीस्थापकता’ असे म्हणतात. दुष्काळ /अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेती दुष्काळी वर्षात आणि सरासरी वर्षात किती उत्पादन देते, याची तुलना करून शेतीच्या स्थितिस्थापकतेचा निर्देशांक (Drought Resilient Ratio, DRR) काढला जातो.

Index of Agricultural Positioning
Index of Swimming Ability : तरण क्षमतेचा निर्देशांकांबद्दलची माहिती...

थोडक्यात, पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झालेल्या गावामध्ये सर्वसाधारण पर्जन्यमान मिळालेले वर्ष व त्याला जोडून येणारे दुष्काळ प्रवण वर्ष या दोन्ही वर्षांचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला या निर्देशांकाद्वारे करता येतो. किंवा एकाच पाणलोट क्षेत्रातील एकसारखीच हवामान स्थिती असलेले, परंतु पाणलोट विकासाची कामे न झालेल्या व कामे झालेल्या गावांचे तुलनात्मक मूल्यमापन आपण या निर्देशांकानुसार करू शकतो. स्थितीस्थापकतेचा निर्देशांक काढण्याचे सूत्र पुढील प्रमाणे...

०.५ (समतुल्य अन्न पिकांचे उत्पादन) + ०.३ (समतुल्य चारा उत्पादन) + ०.२ (समतुल्य फळ पिकांचे उत्पादन) दुष्काळी वर्षांत

स्थितिस्थापकतेचा निर्देशांक (DRR) = ---------------------------------------------------------------------------------

०.५ (समतुल्य अन्न पिकांचे उत्पादन) + ०.३ (समतुल्य चारा उत्पादन) + ०.२ (समतुल्य फळ पिकांचे उत्पादन) सर्वसाधारण वर्षात

उदा. कडवंची (ता. जि. जालना) येथील एकूण १८८८ हेक्टर क्षेत्रापैकी साधारणपणे १५११ हेक्टर क्षेत्र हे लागवडीखाली आहे. या गावातील पाणलोटक्षेत्र विकास व व्यवस्थापनानंतर दुष्काळ /अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेतीच्या स्थितीस्थापकतेचा निर्देशांक सूत्रानुसार काढला आहे.

०.५ (१९०४.०५) + ०.३ (११३०) + ०.२ (२२६४७)

DRR = -------------------------------------------------------

०.५ (२४६६) + ०.३ (१४५०) + ०.२ (२२६४७)

९५२.२ + ३३९ + ४५२९.४

DRR = ------------------------------------------------

१२३२.८+ ४३५ + ४५२९.४

५८२०.६

DRR = ---------------------------------

६१९७.२

DRR= ०.९३

या निर्देशांकाची किंमत शून्य ते एक या दरम्यान येते. जितकी संख्या जास्त तितका दुष्काळास अनुरूप शेतीतील बदल किंवा लवचिकता असे आपण म्हणू शकतो. कडवंचीमध्ये या निर्देशांकाची किंमत ०.९३ इतकी आली. म्हणजेच या क्षेत्रामध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली तरी हे क्षेत्र फार लवकर सरासरी इतक्या पूर्वपदावर येते. कारण या गावामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाची मूलभूत कामे झाली आहेत.

त्यामुळे या गावातील शेती बऱ्यापैकी हवामान पूरक झाली आहे. हे गाव अवर्षणप्रवण क्षेत्रात असून, या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वर्गवारी ‘GP३३’ या पाणलोटामध्ये समावेश होतो. हा एकूण पाणलोट साधारण ९२०० हेक्टरचा असून, त्याचा समावेश अतिशोषित (overexploited) या वर्गवारीमध्ये होतो. ‘इंडो जर्मन पाणलोट विकास कार्यक्रम’ अंतर्गत माथा ते पायथा या तत्त्वाने पाणलोट विकासाचे सर्व उपचार पूर्ण करण्यात आले.

त्याचे व्यवस्थापनही गावकऱ्यांनी योग्य प्रकारे टिकवले आहे. गावातील ३१८ विहिरींचा जलसाठा वाढल्याने पीक बदल झाली आणि एकूणच शेती उत्पादकताही वाढली आहे. अनेक शेतकरी द्राक्षासारख्या पिकाकडे वळले आहेत. त्यातून गावामध्ये आर्थिक संपन्नता आली आहे. सध्या कडवंचीमध्ये दुष्काळास प्रतिकारक्षम आणि आर्थिकदृष्ट्या अधिक फायदा देणारी आठ पिके प्रामुख्याने घेतली जातात.

त्यामुळे येथील प्रति माणसी आर्थिक उत्पन्न २००२-०३ मध्ये सरासरी ३२६५ रुपये होते, ते वाढून २०२२-२३ मध्ये सरासरी १.७५ लाख रुपये झाले आहे. प्रत्येक कुटुंबास सुमारे सात ते नऊ लाख रुपये शेतीतून मिळतात. शेती व शेतीपूरक उद्योगातून या वर्षी ५२ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. प्रकल्पपूर्व व पश्‍चात (म्हणजेच २०२२-२३ मध्ये) मोठा बदल दिसून येतो. उपलब्ध जलसंपदेतील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा काटेकोर वापराचे नियोजन बसवले आहे. यात ठिबक सिंचन, सूक्ष्म तुषार सिंचन, मल्चिंग यासारख्या पद्धतींचा अवलंब केला जातो.

Index of Agricultural Positioning
Water Productivity Index : संवर्धित जल उत्पादकता निर्देशांक

तक्ता १ - कडवंची पिकांचे क्षेत्र खालील प्रमाणे...

२०२२ मध्ये (सर्वसाधारण वर्षात) कडवंचीमधील पर्जन्यमान ६५० मिलिमीटर --- २०२३ मध्ये (दुष्काळी वर्षांत) कडवंचीमधील पर्जन्यमान ४८० मिलिमीटर

पीक --- क्षेत्र --- आकडेवारी टनांमध्ये/ प्रतिवर्षी --- कडवंचीतील पिकांची एकूण उत्पादकता --- पीक --- क्षेत्र --- आकडेवारी टनामध्ये/ प्रतिवर्षी --- कडवंचीतील पिकांची एकूण उत्पादकता

बाजरी --- ३ --- २.२ --- ६.६ --- बाजरी --- ३ --- २ --- ६

उडीद --- ११ --- २ --- २२ --- उडीद --- ११ --- १.५ --- १६.५

मूग --- ६० --- २ --- १२० --- मूग --- ६० --- १.५ --- ९०

कापूस --- ३०२ --- ४ --- १२०८ --- कापूस --- ३०२ --- ३ --- ९०६

रब्बी ज्वारी --- ३५० --- २.५ --- ८७५ --- रब्बी ज्वारी --- ३५० --- २ --- ७००

गहू --- १० --- ३ --- ३० --- गहू --- १० --- ३ --- ३०

तूर --- ४० --- ३.५ --- १४० --- तूर --- ४० --- ३ --- १२०

आले --- ०२ --- ३० --- ६० --- आले --- ०२ --- १८ --- ३६

०.५ (समतुल्य अन्न पिकांचे उत्पादन) --- २४६५.६ --- ०.५ (समतुल्य अन्न पिकांचे उत्पादन) --- १९०४.५

०.३ (समतुल्य चारा उत्पादन) (१४०० टन हिरवा चारा/५० टन इतर पिकांपासून मिळणारा चारा) --- १४५० ---

०.३ (समतुल्य चारा उत्पादन) (११०० टन हिरवा चारा/३० टन इतर पिकांपासून मिळणारा चारा) --- ११३०

द्राक्ष --- ६०० --- ३५ --- २१००० --- द्राक्ष --- ६०० --- ३५ --- २१०००

डाळिंब --- २० --- १६ --- ३२० --- डाळिंब --- २० --- १६ --- ३२०

सीताफळ --- १२ --- १४ --- १६८ --- सीताफळ /मोसंबी --- १२ --- १४ --- १६८

मोसंबी --- १३ --- ३५ --- ४५५ --- मोसंबी --- १३ --- ३५ --- ४५५

भाजीपाला --- ८८ --- ८ --- ७०४ --- भाजीपाला --- ८८ --- ८ --- ७०४

०.२ (समतुल्य फळ पिकांचे उत्पादन) --- २२६४७ --- ०.२ (समतुल्य फळ पिकांचे उत्पादन) --- २२६४७

पिकांचे क्षेत्र --- १५११ --- पिकांचे क्षेत्र --- १५११

कडवंचीतील शेती स्थितीस्थापकतेचा निर्देशांक व जल व्यवस्थापन

कडवंचीमध्ये पाणलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून भूजल उपलब्धता वाढली. २०२२ मध्ये सरासरीइतका, तर २०२३ मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडूनही द्राक्षशेतीतून चांगले उत्पादन मिळाले. उलट कमी पावसाच्या स्थितीमुळे आर्द्रता कमी राहून रोगाचे प्रमाण कमी राहिल्याचे कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथील शास्त्रज्ञांनी सांगितले. निसर्गाच्या चौकटीमध्ये राहून नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर व्यवस्थापन केल्यास निसर्गही भरभरून दान देतो. कधीकाळी पाण्याची टंचाई असणारे गाव सामूहिक प्रयत्नांतून आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले आहे.

महाराष्ट्र राज्याचा ८२ टक्के भूभाग हा काळा पाषाणाचा (Compact Basalt) असून, येथील जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता अतिशय कमी आहे. कडवंचीमध्येही हीच स्थिती आहे. येथील पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाचा फायदा वाघरूळ व नांदापूर या शेजारच्या दोन गावांना अत्यल्प प्रमाणात झाला आहे. कडवंची गावाच्या यशकथेमध्ये ग्रामस्थ व मराठवाडा शेती साह्य मंडळाचे विजयअण्णा बोराडे, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथील अभियंता पंडित वासरे व सहकाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे.

(* या लेखासाठी अभियंता पंडित वासरे यांचे मोलाचे सहकार्य झाले आहे.)

संपर्क - डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे)

डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com