
Risod News : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता येथे महाविकास आघाडीच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ५०० ट्रॅक्टरसह शेकडोंच्या संख्येने शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. अमरदास बाबा संस्थानच्या भव्य प्रांगणातून मोर्चाला सुरुवात झाली होती.
सोमवारी (ता. १४) महाविकास आघाडीच्या वतीने आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. येथील अमरदास बाबा यात्रा मैदानापासून ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात होऊन अष्टभुजा देवी चौक, आसन गली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिव्हिल लाइन मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला.
या ठिकाणी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार झनक यांच्यासह इतर नेत्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की वाशीम जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करावा, सोयाबीनला हमीभाव द्यावा, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, वीज समस्या दूर करावी, शेतकऱ्यांचे स्प्रिंकलर व ठिबकचे अनुदान जमा करावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.