Pune News : जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, बारामती आणि पुरंदर तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशा मागणीचे पत्र ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘१२ व १३ जून रोजी पुरंदर, इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागातील गावांना भेट देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
अल्प पर्जन्यमान असलेल्या या भागांतील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य शासनाने प्रामुख्याने पुरंदर उपसा सिंचन योजना, गुंजवणी प्रकल्प, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना हाती घेतल्या आहेत.
मात्र दौऱ्यावेळी शेतकरी-ग्रामस्थांशी संवाद साधला असता या योजनांच्या अंमलबजावणीबाबत अनेक समस्या असल्याचे दिसून आले. जनसंवादावेळी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा या करिता ग्रामस्थांनी मागण्यांसोबत काही उपाययोजना देखील सुचवल्या. या समस्या आणि मागण्यांबाबत प्रकल्पनिहाय व गावनिहाय स्वतंत्र टिप्पणीसमवेत जोडली आहे. कृपया टिप्पणीचे अवलोकन व्हावे.’
पुणे जिल्ह्यातील या तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपणास विनंती आहे की, आपल्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे दोनही सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच मृद व जलसंधारण मंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठकीचे आयोजन व्हावे.
या बैठकीस संबंधित विभागांचे सचिव व अधिकारी यांना हजर राहण्याच्या सूचना द्याव्यात व स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे. या बैठकीवेळी दौऱ्याप्रसंगी निदर्शनास आलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासंदर्भात चर्चा घडून यावी तसेच कायमस्वरूपी उपाययोजनांसंदर्भात चर्चा आणि नियोजन व्हावे, अशी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.