Agriculture Entrepreneurship : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचे बीज रुजवा ; डॉ. गडाख

Dr. Sharad Gadakh : कृषी’च्या विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानासोबतच उद्यमशीलतेचे धडे देण्याची गरज आहे,’’ असे मत कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्‍त केले.
Dr. Sharad Gadakh
Dr. Sharad GadakhAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : ‘‘कृषी अभ्यासक्रमाला प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रक्रियाजन्य पदार्थांचे उत्पादन, विक्रीबाबत कळल्यास त्यातून भविष्यात कृषी उद्योजक घडतील. त्यामुळे विद्यार्थीदशेतच त्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच उद्यमशीलतेचे धडे देण्याची गरज आहे,’’ असे मत कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्‍त केले.

नागपूर कृषी महाविद्यालया अंतर्गत सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू यांच्या पुढाकाराने डेअरी विभागात विविध उत्पादन व उत्पन्नक्षम प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. २४) डॉ. गडाख यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण झाले.

Dr. Sharad Gadakh
Maize Tur Market : मका, तुरीच्या किमतींत वाढ

डॉ. गडाख म्हणाले, ‘‘नागपूर कृषी महाविद्यालयाने शेळी, कुक्‍कुटपालन, हायड्रोफोनिक्‍स चारा उत्पादन, विक्री केंद्र, कंपोस्ट, ऍझोला उत्पादन असे विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. उत्पन्नवाढीचा हा सक्षम स्रोत ठरेल. त्यांच्याच अनुकरणातून विद्यापीठा अंतर्गत असलेल्या इतरही कृषी महाविद्यालयांनी अशा उपक्रमांसाठी पुढे यावे.

विद्यापीठा अंतर्गतच्या डेअरी विभागासह इतरही १८ विभागांनी विद्यार्थ्यांसाठी अशा शिका आणि कमवा संकल्पनेवर काम करण्याची गरज आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना उत्पादन ते विक्रीपर्यंतचे धडे मिळतील व त्यातून भविष्यात कृषी उद्योजक घडण्यास मदत होतील.’’

Dr. Sharad Gadakh
Milk Rate in Nagar: नगरमध्ये दूध दरासाठी अजित नवले यांचे आमरण उपोषण सुरू

डेअरी विभागाचे प्रमुख विलास अतकरे यांनी या ठिकाणी १० ते १२ वरून ३५ वर शेळ्या नेल्या आहेत. पोल्ट्री शेडमध्ये ४०० कोंबड्या आहेत. त्यासोबतच दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन व विक्रीसाठी देखील त्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल कुलगुरूंनी या वेळी त्यांचे कौतुक केले.

‘शिका आणि कमवा’ संकल्पनेनुसार उत्पादन ते विक्री अशा बाबींवर काम झाल्यास संबंधित कृषी महाविद्यालयाला नफ्यातून ५० टक्‍के विद्यार्थ्यांना देता येतील. त्या दृष्टीने काम होण्याची गरज आहे. नागपूर कृषी महाविद्यालयाने त्यासाठी पहिल्यांदा पुढाकार घेतला हे कौतुकास्पद आहे. इतर कृषी महाविद्यालयांनी देखील याचे अनुकरण करावे.
डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com