Krushi Holic : ‘कृषी होलिक’तर्फे गोमय गणेश, दुग्धजन्य पदार्थांची विक्री

Cow Dung Goods : कृषी शिक्षणासोबत विक्री कौशल्य, आर्थिक व्यवहार आणि बाजारपेठेतील ग्राहकांची नेमकी मागणी काय? हे समजून घेण्यासाठी पुणे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘कृषी होलिक’ स्टार्टअप सुरू केले आहे.
Krushi Holic
Krushi HolicAgrowon
Published on
Updated on

Pune News : कृषी शिक्षणासोबत विक्री कौशल्य, आर्थिक व्यवहार आणि बाजारपेठेतील ग्राहकांची नेमकी मागणी काय? हे समजून घेण्यासाठी पुणे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘कृषी होलिक’ स्टार्टअप सुरू केले आहे.

याबाबत कृषी महाविद्यालयातील साक्षी घोलप, तेजल पवार म्हणाल्या, की गेल्या वर्षी आठ विद्यार्थ्यांनी मिळून ‘कृषी होलिक’ स्टार्टअप सुरू केले.

याचा उद्देश म्हणजे शिक्षणासोबत दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती, विक्री नियोजन, ग्राहकांसोबत संवाद साधण्याची कला, शहरी बाजारपेठेची मागणी समजून घेणे हा आहे. गेल्या वर्षी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आणि गोमय गणेश मूर्तिकलेचे प्रशिक्षण घेतले. प्रायोगिक तत्त्वावर पर्यावरणपूरक ४० गणेशमूर्तींची निर्मिती आणि विक्री केली. आमच्या ‘स्टार्ट अप’ने गेल्या वर्षी पन्नास हजारांची उलाढाल केल्याने आत्मविश्‍वास वाढला.

Krushi Holic
Goseva Commission : गोसेवा आयोग : आव्हाने अन्‌ दृष्टिकोन

यंदा ‘स्टार्ट अप’सोबत कृषी आणि उद्यानविद्या महाविद्यालयातील एकवीस विद्यार्थी जोडले आहेत. याबाबत यश विधाते, निखिल जगताप म्हणाला, की आम्ही स्टार्ट अपमध्ये तेरा हजार रुपये गुंतवणूक केली आहे. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये ५० पर्यावरणपूरक गोमय गणेशमूर्ती तयार केल्या. उर्वरित १५० गोमय गणेशमूर्ती ‘साहिवाल क्लब’च्या सदस्यांकडून तयार करवून घेतल्या आहेत.

Krushi Holic
Goseva Aayog : ‘गोसेवा आयोग’ चे स्वागत, पण...

कृषी महाविद्यालयाच्या विक्री केंद्रावर गोमय गणेशमूर्ती, धूप, पणती याचबरोबरीने देशी गाईचे तूप,खवा, फॅट फ्री लस्सी, पनीर, पेढे तसेच गांडूळ खत, प्रॉम खत विक्री सुरू केली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ‘फुले अमृत’ ब्रॅण्ड तयार केला आहे.

विविध उत्पादनांच्या विक्रीतून दीड लाखांची उलाढाल अपेक्षित आहे. आम्हाला महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, डॉ. सोमनाथ माने, डॉ.धीरज कणखरे, डॉ.प्रमोद पाटील तसेच विविध विभागांतील प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

‘कृषी होलिक’चे सदस्य ः

मेहूल शहा, यश विधाते, निखिल जगताप, साक्षी घोलप, तेजल पवार, ओंकार कदम, श्‍लोक वाबळे, ऋतुराज पाटील, आदित्य पाटील, मेहूल भालेराव, वेदांत पुंड, नीरज मालूमल, विराज तडसे, वैशाली परदेशी, वैष्णवी गोरे, प्रतीक्षा फडतरे, अमृता शेंडे, आर्या सूर्यवंशी, राजेश्‍वरी गोरे, सलोनी माने, अमृता माने.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com